Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

संचालक मंडळाच्या रणनितीमुळे ‘यशवंत’च्या जमीन विक्रीचा ठराव आवाजी मतदानाने मंजूर! अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये सभा गुंडाळली

जनार्दन दांडगेby जनार्दन दांडगे
Wednesday, 26 February 2025, 17:07
yashwant sugar factory annual meeting ends in 40 minutes theur Pune

पुणे: यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने आखलेल्या रणनितीमुळे, कारखान्याच्या मालकीच्या ९९ एकर जमीन विक्रीबरोबरच, सभेच्या पत्रिकेवरील दोन विषय वगळता अकरा विषय संचालक मंडळाने अभूतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने मंजूर करुन घेण्यात यश मिळवले. जिल्ह्याच्या सहकाराबरोबरच, कारखान्याच्या सभासदांचे लक्ष लागून राहिलेली कारखान्याची 41 वी सर्वसाधारण सभा, संचालक मंडळाने आखलेल्या रणनितीमुळे अवघ्या चाळीस मिनिटांमध्ये संपली. यावेळी काही ठराविक माजी संचालक व त्यांच्या समर्थकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सभासदांनी जमीन विक्रीच्या ठरावात अधिक चर्चा होऊ न देता आक्रमक पवित्रा घेत संचालक मंडळाला पाठिंबा दिला. तसेच कारखान्याची जमिन विक्री करण्याच्या निर्णयाला समर्थन दिले.

थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्रीच्या ठरावासह भागभांडवल उभारणी संदर्भात १३ विषय विषय पत्रिकेवर घेऊन सर्वसाधारण सभेचे आयोजन कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या विषय पत्रिकेवरील पहिल्याच विषय असलेल्या मागील २८/१२/२०१० च्या सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे, या विषयावरुन सभेत अभूतपूर्व गोंधळास सुरुवात झाली. या सभेत सभासद पांडुरंग काळे यांनी कारखान्याचा मागील इतिवृत्तांत तसेच सभासदांची देणी कारखान्याने का दिली नाही ? म्हणत संचालक मंडळाला धारेवर धरले. मात्र, संचालक मंडळानी कारखान्याकडे शिल्लक नाही, तसेच कारखाना काही निर्णय घेण्यास प्रयत्न करीत असल्याचे सभेच्या निदर्शनास आणून दिले. परंतु, कारखान्याच्या प्रभारी कार्यकारी संचालकांच्या नियुक्तीबरोबरच, पहिल्या विषयावरुन पांडुरंग काळे, विकास लंवाडे यांनी सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला.

कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक राहुल घुले, योगेश काळभोर, काही संचालकांसह बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांनी पांडुरंग काळे यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, काळे त्यांच्या प्रश्नावर ठाम राहिल्याने सभेत गोंधळांची परिस्थिती निर्माण झाली. या गोंधळात कारखान्याचे सभासद व सोरतापवाडीचे माजी सरपंच सागर चौधरी यांनी कारखाना गेली १३ वर्षे बंद असून कारखान्याच्या भविष्याच्या दृष्टीने निर्णय घ्यावा. मागील १३ वर्षांत काय झाले? याच्याशी सभासदांना देणेघेणे नसून सभा विषय पत्रिकेच्या मुद्द्यावर चालावी म्हणून आक्रमक भूमिका घेतली. या भूमिकेला सभासदांनी प्रतिसाद देत विषय मंजूर करुन घ्यावेत, अशी मागणी केली. या मागणीवर सभासद पांडुरंग काळे, विकास लवांडे, धनंजय चौधरी यांचे समाधान न झाल्याने काही वेळ कार्यकारी संचालक कैलास जरे यांच्यावर धावून जाण्याचा प्रयत्न झाला.

 

दरम्यान सुभाष जगताप, किशोर उंद्रे यांच्या हस्तक्षेपानंतरही पांडुरंग काळे शांत होत नसल्याचे लक्षात येताच, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक मोरेश्वर काळे यांनी कारखान्याचे कार्यकारी संचालकांना दुर सारुन सभेची सुत्रे स्वतःकडे घेतली. गोंधळातच मोरेश्वर काळे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून, उपस्थितांना ठराव मंजूर आहेत का? अशी विचारणा केली. यावर उपस्थित सभासदांनी तेरापैकी दोन ठराव वगळता उर्वरीत अकरा ठराव मंजूर अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. या गोंधळात घोषणा देत संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली.

दरम्यान या सर्वसाधारण सभेत कारखान्याच्या संचालक मंडळाने विषय पत्रिकेवरील चार व पाच हे दोन ठराव वगळता कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्री करण्याचा महत्वपूर्ण ठराव गोंधळात मंजूर करुन घेतला आहे. तसेच संस्थेच्या नाव बदलासही मान्यता देणे, हा विषय मंजूर करुन घेतला आहे. या सभेत अध्यक्ष सुभाष जगताप, उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक मोरेश्वर काळे, राहुल घुले, संतोष कांचन, अमोल हरपळे, योगेश काळभोर यांनी सभासदांना उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. तर या सभेसाठी बाजार समितीचे
कृषी बाजारसमितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर,  माजी सभापती तथा विद्यमान संचालक प्रकाश जगताप, शशिकांत गायकवाड, कारखान्याचे माजी संचालक महादेव कांचन, कारखान्याचे विद्यमान संचालक सुनिल कांचन, सुशांत दरेकर, विजय चौधरी, शशिकांत चौधरी, ताराचंद कोलते, नवनाथ काकडे, सागर काळभोर, रामदास गायकवाड, शामराव कोतवाल, हेमा काळभोर, रत्नाबाई काळभोर, दिलीप शिंदे, मोहन म्हेत्रे, कुंडलिंक थोरात यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रा. के. डी. कांचन यांच्यासह अनेकांचा जमीन विक्रीस विरोध..
दरम्यान संचालक मंडळाने जमीन विक्रीबरोबरच विषय पत्रिकेवरील अकरा विषय मंजूर केल्याची घोषणा केली असली तरी, कारखान्याचे माजी अध्यक्ष प्रा. के. डी. कांचन, माजी संचालक पांडुरंग काळे, विकास लंवाडे व काही सदस्यांनी ही सभाच बेकायदा असल्याचा दावा केला आहे. या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबत बोलताना के. डी. कांचन व विकास लंवाडे म्हणाले, संचालक मंडळाने ही सभा दादागिरीच्या जोरावर रेटून नेली आहे. सभासदांना बोलू न देणे ही बाब बेकायदेशीर आहे. याबाबत आम्ही न्यायालयात धाव घेणार आहोत.

जनार्दन दांडगे

जनार्दन दांडगे

गेल्या २३ वर्षापासून पत्रकारीता क्षेत्राचा अनुभव आहे. दैनिक सकाळ च्या माध्यमातून गेली २१ वर्षे कार्यरत, नि:पक्षपातीपणे काम, जिल्ह्यातील गुन्ह्यांच्या बातम्यांकडे जास्त भर, ६ वर्षापूर्वी भाईचंद हिराचंद रायसोनी (BHR) या पतसंस्थेचा १६०० कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणण्यासाठी हातखंडा तर १४ वर्षांपूर्वी एका बिल्डरचा ४५० कोटी रुपयांचा बँकिंग घोटाळा उघडकीस आणला, नागरिकांच्या समस्या बातम्यांच्या माध्यमातून समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न,जिल्ह्यातील बेकायदा वाळू, जुगार, मटका, दारू आणि अवैध धंदे यांच्यावर कारवाईची मागणी, प्रशासनाच्या माध्यमातून नागरिकांना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न, राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण यांच्या लेखनात विशेष प्राविण्य. सध्या पुणे प्राईम न्यूज चे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.

ताज्या बातम्या

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्…

Sunday, 5 July 2026, 18:55

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

Sunday, 5 July 2026, 18:47

फ्लॅटधारकांना मोठा दिलासा! सोसायटीच्या मेंटेनन्स शुल्काचे नियम बदलले; राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर

Sunday, 5 July 2026, 18:05

रेल्वेचा सर्वात मोठा निर्णय! आता ट्रेन सुटण्यापूर्वी १५ मिनिटांपर्यंत मिळणार कन्फर्म तिकीट; नियम बदलला

Sunday, 5 July 2026, 17:19

‘तुम्ही बुधवारपेठेत का फिरताय? मी तुमच्यावर’ पोलिसांनीच धमकी देत उकळली खंडणी; गुन्हा दाखल झाल्यावर फरार…

Sunday, 5 July 2026, 16:33
Next Post
Barack, Michelle Obama clap back at divorce rumours

ओबामा तुम्हीसुद्धा...मिशेल, बराक राहताहेत वेगवेगळे; घटस्फोट झाल्याच्या बातम्यांनी जगभर चर्चा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.