Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शिरूर ग्रामीण येथे अडीच वर्षांच्या ग्रामपंचायत सदस्य पद वाटपाचा वाद चिघळला! दोन गटात कोयते, रॉड आणि दांडक्यांनी हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादीवरून 11 जणांवर गुन्हा..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 17 November 2026, 12:28

शिरूर : शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीतील सदस्यपदाच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळावरून घावटे कुटुंबातील दोन गटांमध्ये सुरू असलेला वाद अखेर हाणामारीपर्यंत पोहोचला. बुधवारी मध्यरात्री झालेल्या या राड्यात कोयते, लोखंडी रॉड आणि दांडक्यांचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत एक महिला आणि एक तरुण जखमी झाले असून, दोन्ही बाजूंच्या एकूण 11 जणांविरुद्ध शिरूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

शिरूर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा देऊन ते दुसऱ्या सदस्याला द्यायचे होते. मात्र, वेळेत पद न सोडल्याने घावटे कुटुंबातील दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला. याच वादाचे रूपांतर बुधवारी रात्री जोरदार मारामारीत झाले.

सीमा सोमनाथ घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, माजी उपसरपंच सचिन भाऊसाहेब घावटे, प्रथमेश धनंजय घावटे आणि ऋषिकेश विजय शेलार हे त्यांच्या घरी आले. त्यांनी पती सोमनाथ घावटे यांना मारहाण केली. तसेच सीमा घावटे आणि त्यांचे दीर नितीन यांनाही लोखंडी रॉडने मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

यावेळी कोयत्याने हल्ला करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. हल्लेखोरांची मोटार (क्र. एम.एच. 12 व्हीक्यू 7072) घटनास्थळीच सोडून ते पळून गेल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर या मोटारीची दगड आणि कुऱ्हाडीने तोडफोड करण्यात आली.

दुसरीकडे, प्रथमेश धनंजय घावटे यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळीच बाजू मांडली आहे. वाद मिटवण्यासाठी गेलो असता सोमनाथ घावटे, नितीन घावटे, विलास घावटे, प्रथमेश सोमनाथ घावटे आणि इतरांनी रॉड व दांडक्याने हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी सीमा घावटे यांनी सचिन घावटे यांच्या गळ्यातील दहा तोळ्यांची सोनसाखळी हिसकावून घेतल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, रात्री उशिरा प्रथमेश घावटे यांच्यावर शंकर शिंदे आणि आदी पैठणकर यांनी ट्रॅक्टर आडवा लावून कोयत्याने हल्ला केल्याचा आरोपही करण्यात आला असून, या घटनेत प्रथमेश जखमी झाले. दोन्ही बाजूंच्या परस्परविरोधी तक्रारींवरून शिरूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

अडीच वर्षांच्या पदवाटपाचा वाद

अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळी घावटे कुटुंबात सदस्यपदाच्या वाटपाबाबत अंतर्गत करार झाल्याचे सांगण्यात येते. ठरल्याप्रमाणे अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सचिन घावटे यांनी पदाचा राजीनामा देऊन ते सीमा घावटे यांच्याकडे सोपवायचे होते. मात्र, वेळेत राजीनामा न दिल्याने वाद निर्माण झाला. ग्रामपंचायतीतील पदाच्या वाटपावरून सुरू झालेला हा वाद अखेर परस्पर मारहाण, वाहनाची तोडफोड आणि पोलिसांत गुन्हे दाखल होण्यापर्यंत पोहोचला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

शिरूर ग्रामीण येथे अडीच वर्षांच्या ग्रामपंचायत सदस्य पद वाटपाचा वाद चिघळला! दोन गटात कोयते, रॉड आणि दांडक्यांनी हाणामारी, परस्परविरोधी फिर्यादीवरून 11 जणांवर गुन्हा..

Tuesday, 17 November 2026, 12:28

शेतकऱ्यांच्या संस्थेच्या भूखंडावर खासगी विकसकाचा डोळा? हवेली खरेदी-विक्री संघाच्या व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी!

Tuesday, 17 November 2026, 12:19

सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी होणार? 18 हजारांचा पगार थेट 69 हजारांवर जाणार; सरकार काय निर्णय घेणार?

Tuesday, 17 November 2026, 12:03

इंदुरीकर महाराज पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! ‘मुली मुलांवर प्रेम करत नाहीत, तर…’ वक्तव्याने नवा वाद पेटणार?

Tuesday, 17 November 2026, 11:49

पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याची दहशत!भररस्त्यात दुचाकीस्वारावर कोयत्याने सपासप वार; थरारक हल्ला…

Tuesday, 17 November 2026, 11:26

पुण्यात HCMTR वरून नवा वाद! SB रोडवरील झाडं-घरं वाचणार की जाणार? महापालिकेने स्पष्ट केली भूमिका..

Tuesday, 17 November 2026, 11:12
  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp