लोणी काळभोर, (पुणे) : पुणे ग्रामीण पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटी, विश्वराजबाग येथे शनिवारी (ता. 31) घेतली जाणार आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
पात्र उमेदवारांनी हॉल तिकीट, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन शानिवारी सकाळी 6 वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहावे, असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. सदरची लेखी परीक्षा ही सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास सुरु होणार आहे.
पुणे ग्रामीण पोलीस घटकाची पोलीस शिपाई पदाच्या 2022-23 च्या मैदानी चाचणीत उत्तीर्ण होवून लेखी परीक्षेस पात्र झालेल्या उमेदवारांचा निकाल दि. 20 ऑगस्टला घोषित करण्यात आला आहे. लेखी परीक्षेस पात्र असलेल्या एकूण 5 हजार 544 उमेदवारांची दि.31 ऑगस्ट 2024 रोजी लेखी परीक्षा घेण्याचे नियोजित करण्यात आले आहे.
दरम्यान, पात्र उमेदवारांनी लेखी परीक्षेच्या ठिकाणी सकाळी 6 वाजता उपस्थित रहावे. असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी केले आहे.