Australia Won ICC Cricket World Cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या ड्रेसिंग रुममधला एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा फोटो खुद्द ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टेटसवर शेअर केला आहे. यानंतर व्हायरल होत असलेल्या एका फोटोत ऑस्ट्रेलियन क्रिकेटर मिचेल मार्श दोन्ही पाय विश्वचषक ट्रॉफीवर ठेवून बसलेला दिसत आहे.
या फोटोमुळे याला उन्माद म्हणावं की मस्ती? असा प्रश्न क्रिकेट चाहते उपस्थित करू लागले आहेत. ऑस्ट्रेलियाने विश्वचषक ट्रॉफी उचलल्यानंतर काही तासांमध्येच हा फोटो शेअर करण्यात आला असून मार्शच्या या कृतीमुळे वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
रविवारी झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताचा ६ गडी राखून पराभव करून सहावे विजेतेपद पटकावले. अहमदाबादमध्ये हा सामना झाला, जिथे ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात भारतानं आधी फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २४१ धावांचं आव्हान दिलं होतं.
रोहित शर्माच्या सुरुवातीच्या तडाखेबाज खेळीनंतर विराट कोहली आणि के. एल. राहुल वगळता अन्य खेळाडूंना लौकिकाला साजेशी फलंदाजी करता आली नाही. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने उल्लेखनीय कामगिरी करत 120 चेंडूत 137 धावा करत आपल्या संघाला विजयाकडे दिशेने नेले. ऑस्ट्रेलियाने ४२ चेंडू बाकी असताना सहा विकेट्स राखून आरामात विजय मिळवला.
“Dear @ICC and @BCCI, expressing concern over Mitch Marsh placing the World Cup trophy under his feet. This behavior seems disrespectful to the game’s integrity. Kindly review and address this matter appropriately. #CricketEthics” pic.twitter.com/3nfnI9skdQ
— Saini Vaib (@reverb_cia) November 20, 2023