युनूस तांबोळी
Nature | शिरूर : एक घास चिऊचा…असे बोबडे बोल बोलून चिमुकल्यांना घास आपन भरवतो. बालपणापासून सोबत करणाऱ्या या चिमणीचे दर्शन आता दुर्लक्षीत होऊ लागले आहे. कधी काळी अंगणात ( Nature ) दिसणारी चिमणी आता दुर्मीळ बनली आहे. त्यामुळेच या चिंमण्याने …या रे अंगणात… अशी साद घालण्याची वेळ आली आहे.
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस…
२० मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे. चिमणी संवर्धनासाठी जागर करण्याचा दिवस आहे. चिमणी हा पर्यावरणाचा समतोल राखणारा महत्वपुर्ण पक्षी असल्याने त्यांच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. लहानपणापासून अंगणात खेळणारा हा पक्षी आपल्याला सहजतेने भेटत असतो.
मात्र अलिकडच्या काळात ही चिमणी दिसेनासी झाल्यासारखी पहावयास मिळत आहे. याच साठी प्रत्येक शाळेत, पक्षी प्रेमींकडून चिमणी संवर्धनासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न होत आहेत. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे कित्येक धोके उभे राहिले आहेत. त्यामुळेच जगभरातून आता चिमणी जगायला हवीयाची जाणीव झाली आहे. त्यामुळे २०१० पासून २० मार्च हा जागतीक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.
जीवे जीवस्य जीवनम ही तर खरी निसर्गाची साखळी आहे. त्यातून निसर्गाचा समतोल अवलंबून असतो. तो डळमळीत झाला तर नैसर्गीक आपत्ती रोगराई येऊ शकते. हे आता प्रत्येकाला माहिती झाले आहे. त्यामुळेच चिमणी संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. चिमणीला निवाऱ्याची अन खाद्य पदार्थांची उपलब्धता झाली तर चिमण्या परत दिसू लागतील. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न होणे अगत्याचे आहे.
सुनील जाधव – पक्षी प्रेमी नारायणगाव
नामशेष होण्याची कारणे…
१ ) प्रदूषणाचे दुष्पपरिणाम
२ ) वाढते औद्योगीकरण
३ ) विस्तारणारे शहरीकरण
४ ) वाढत गेलेली फ्लॅट संस्कृती
५ ) जागोजागी असणारे मोबाईल टॅावर्स
६ ) रासायनिक खतांचा वापर
७ ) किटकनाशकांची फवारणी
चिमणी जगावी यासाठी शाळांमधून विद्यार्थांना प्रबोधन करण्यात येत आहे. त्यानूसार शाळेत त्यांच्या खाद्याची व पिण्याच्या पाण्याची सोय केली आहे. विद्यार्थ्यासाठी ‘चिऊचे घरटे’ हा उपक्रम राबवित आहोत. निंबध व चित्रकलेतून विद्यार्थ्यांना चिमणी महत्व पटवून दिले जात आहे.
डॅा. विकास शेळके संस्थापक महागणपती स्कूल रांजणगाव गणपती ता. शिरूर
शाळे भोवती वेगवेगळ्या झाडांचा बगीचा उभा केल्याने चिमण्यांबरोबर वेगवेगळे पक्षी येथे येऊ लागले आहे. चिमणी चे महत्व आणि तिच्या संवर्धनासाठी विद्यार्थी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. अन्न आणि पाणी तीला कसे उपलब्ध होईल. यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात.
अनिल शिंदे प्राचार्य, विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई ता. शिरूर
अंगणात खेळणारी चिमणी चिमुकल्यांना हवी हवीसी असते. तिच्या संगोपणाची जबाबदारी आपनच घेतली पाहिजे. त्यामुळे घराच्या छतावर पाण्याची उपलब्धता करणे गरजेचे आहे.
स्वाती दौंडकर शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा जातेगाव ता. शिरूर
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…!
Shirur News : मलठणच्या उपसरपंचपदी दादासाहेब गावडे यांची बिनविरोध निवड
Shirur Crime News : शिरुर शहरात भरदिवसा गाडीची काच फोडून चोरट्यांनी २ लाख रुपये केले लंपास