पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका महिलेच्या पाळीव कुत्र्याला जीव मारण्याची धमकी देत एका नराधमाने २८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा घटना उघडकीस आली आहे. संग्राम कोरेकर असं बलात्कार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी संग्राम कोरेकर याने कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिलेच्या कुत्र्याला गॅलरीतून फेकून देऊन मारून टाकेल अशी जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या डोक्यात कठीण वस्तूने मारहाण केली.
कोंढव्यातील घरात चार ते पाच दिवस जबरदस्तीने बंद करून मारहाण करत तिच्यावरती लैंगिक अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणी आरोपी विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.