२८ फेब्रुवारी १९२८ या दिवशी भारतातील नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर वेंकट रमण यांचा नवीन संशोधन पर लेख प्रसिद्ध झाला. रमण यांच्या स्मरणार्थ हा दिवस सन १९८६ पासून भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविण्यात आले. हा दिन का साजरा करतात, विज्ञान दिन साजरा करण्यामागील उद्दिष्टे कोणती आहेत, मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत होण्यासाठी वर्षभर राबवले जाणारे उपक्रम, याविषयी…
निशा झिंजुरके, मुख्याध्यापिका, कन्या प्रशाला, लोणी काळभोर (ता. हवेली)
डॉ. सी. व्ही. रमण आणि रमण इफेक्ट
विज्ञानाच्या फायद्यांबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. डॉक्टर सी. व्ही. रमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामण केटरिंगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाश किरण धूळकण विरहित पारदर्शक रसायनिक संयोगातून जातो, त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हे पसरलेले प्रकाशाचे किरण एकाच तंदुगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणातून वेगळ्या तरंगाचे असतात. यालाच रमन इफेक्ट म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त १९५४ मध्ये सर्वोच्च भारतीय नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरविण्यात आले.
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे उद्दिष्ट काय?
राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विद्यार्थ्यांना तिरंग्यात प्रणाली कायम ठेवणे, यासह देशाची अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे आहे. केवळ अणुऊर्जेने देशाच्या अथक विकास सुरक्षित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल हे उद्दिष्ट असते. ज्या देशात वैज्ञानिक संशोधन जास्त ते देश प्रगतीपथावर असतात. त्यांची आर्थिक स्थिती उंचावलेली असते. आपल्याला या जागतिक स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर विज्ञानाधिष्ठित समाजाची निर्मिती होणे अत्यंत गरजेचे आहे आणि याचा पाया शालेय जीवनातच रचला गेला पाहिजे. विद्यार्थ्यांना शालेय जीवनात विविध शैक्षणिक अनुभूती दिल्या पाहिजेत. वर्गा वर्गातून वैज्ञानिक चर्चा घडवून आणल्या पाहिजेत. साध्या प्रयोगातून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे.
कृतीतून विज्ञान दिसावे
अंधश्रद्धा हा आपल्या समाजाला लागलेला एक कलंक आहे. याचे समोर उच्चाटन करायचे असेल तर आपला विद्यार्थी विज्ञान जगला पाहिजे. त्याच्या विचारातून, कृतीतून विज्ञान दिसले पाहिजे. विज्ञान दिवस साजरा करण्याची कल्पना सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोविंद कर यांनी मांडली. या शास्त्रज्ञांनी ज्या अनेक विविध योजना सुरू केल्या, त्यातीलच एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे होय.
डॉक्टर वसंत गोवारीकर यांनी दूरदृष्टीने विचार केला की भारतातील विज्ञानाचा एकमेव न्यू बॉल्स पुरस्कार डॉक्टर सी. व्ही. रमण यांना मिळाला आहे तर त्यांच्याशी संबंधित तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्यू दिन निवडण्यापेक्षाही त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध नियर या विज्ञान मासिकाला पाठवला आणि त्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला, ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख होती २८ फेब्रुवारी. म्हणून यादिवशी विज्ञान दिन साजरा केला जातो.