पुणे : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे, त्यात पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरातही गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून एका मागून एक गुन्ह्याच्या घटना समोर येत आहेत. अशातच पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. पुण्यातील वारजे परिसरात राहणाऱ्या एका नराधम बापाने आपल्या पोटच्या मुलीवरच तब्बल एक वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शाळेतील ‘गुड टच बॅट टच’ उपक्रमातून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
आरोपी बापाला अटक..
या घटनेबाबत पुणे पोलिसांनी आरोपी बापाला अटक केली आहे. पंकज देवेंद्र ठाकूर (वय 35) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा मूळचा बिहार येथे राहणारा असून आरोपी पंकज ठाकूर हा आपल्या मुलीवर मागील एक वर्षांपासून अत्याचार करत आहे. मुलीला अश्लील व्हिडीओ दाखवून लैंगिक अत्याचार करत असे. पोलिसांना आरोपीच्या मोबाईलमध्ये असे अश्लील व्हिडिओ देखील आढळले असल्याची माहिती पुणे पोलीसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास करत आहेत.