Wagholi News : लोणी काळभोर: खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ उता-यावर लावण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी वाघोली (ता. हवेली) तलाठी कार्यालयातील दोन खाजगी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. (Two private employees of Wagholi Talathi office arrested for demanding bribe of Rs 50 thousand)
भाऊसाहेब मिकाजी गिरी (वय ५६, रा. साई बालाजी सोसायटी, आव्हाळवाडी, वाघोली, जि. पुणे), संजय मारुती लगड (वय-५३, रा. साईनगर, लोहगाव, ता. हवेली, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोन खाजगी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. (Wagholi News) याप्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
जागेची नोंद ७/१२ उता-यावर घेण्यासाठी मागितली लाच
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांनी पत्नीच्या नावे खरेदी केलेल्या जागेची नोंद ७/१२ उता-यावर घेण्यासाठी वाघोली (ता. हवेली) तलाठी कार्यालयात अर्ज केला होता. ७/१२ उता-यावर नोंद घेण्यासाठी (Wagholi News) तलाठी कार्यालय वाघोली येथे मदतनीस म्हणून काम करणारे संजय लगड व भाऊसाहेब गिरी यांनी तलाठ्यांकडून काम करून देण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच तक्रारदार यांना मागितली होती. याप्रकरणी एका ४६ वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.
सदर तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली असता, जागेची नोंद ७/१२ उता-यावर घेण्यासाठी सजा वाघोली तलाठी कार्यालयात मदतनीस म्हणून काम करणारे भाऊसाहेब गिरी यांनी तलाठी पांगे यांच्यासाठी ४५ हजार रुपये व गिरी यांनी स्वतःसाठी ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तसेच या लाचेसाठी खाजगी इसम संजय लगड यानी सहाय्य केले असल्याचे तपासातून निष्पन झाले. (Wagholi News) म्हणुन त्या दोघांविरुद्ध लोणी कंद पोलीस ठाण्यात लाच मागणीचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे.
पुढील तपास पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले करीत आहेत. (Wagholi News)
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप आयुक्त/ पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Wagholi News : वाघोली-केसनंद रस्त्यावर ट्रक व दुचाकीचा अपघात ; १९ वर्षीय तरुणीचा जागेवरच मृत्यू..
wagholi News : वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांना विशेष उल्लेखनीय पुरस्कार प्रदान
Wagholi News : वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी..!