संतोष गायकवाड
वाघोली, (पुणे) : वाघेश्वर मंदिर ते लोहगाव रोड वर दिवसेंदिवस वाहतूक कोंडीचे प्रमाण वाढत आहे. यामुळे स्थानिक नागरिक रोजच्या वाहतूक कोंडीला त्रस्त झालेले आहेत. नव्याने झालेल्या डी मार्ट मुळे वाहतूक कोंडीच्या समस्येत अधिक भर पडलेली आहे. डी मार्ट ने सुरक्षा रक्षकाची कुठलीही व्यवस्था केलेली नाही त्यामुळे नागरिक बेशिस्त पार्किंग करत आहेत. परिणामी वाहतूक कोंडी अधिक वाढत आहे.
लोहगाव रोडवरील वाहतूक कोंडी व रस्त्याच्या लगत लागणाऱ्या गाड्यांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी व लोहगाव चौकात कायमस्वरूपी ट्राफिक पोलीस नेमण्याची मागणी शिवसैनिक सागर गोरे यांनी लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काइंगडे यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे.