संतोष गायकवाड
Wagholi News : वाघोली, (पुणे) : शाळा, महाविद्यालय परिसरात रोड रोमियोंचा वाढता वावर लक्षात घेता पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांचे सुचनेनुसार ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान राबवण्यात येत आहे. या अनुषंगाने लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत शाळांचे प्राचार्य व शिक्षकांची बैठक वाघोली येथे घेण्यात आली. Wagholi News :
या बैठकीमध्ये लोणीकंद पोलिसांनी उपस्थितांना मुलींच्या सुरक्षिततेबाबत माहिती दिली. तसेच पोलीस काका व पोलीस दीदी यांची नियुक्ती करण्यात आली असून पालक व विद्यार्थ्यांनी शाळा व महाविद्यालय परिसरातील अघटीत घटनांबद्दल पोलिसांना तात्काळ कळविण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. Wagholi News :
शाळा व महाविद्यालय परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या रोड रोमियो व टवाळखोरांवर पोलिसांकडून कारवाई सत्र सुरु आहे. परंतु रोड रोमियोंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने ‘निर्भय विद्यार्थी’ अभियान राबवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर लोणीकंद पोलिसांनी शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षक यांची बैठक घेऊन प्रत्येक शाळा, महाविद्यालयामध्ये नेमण्यात आलेल्या पोलीस काका व पोलीस दीदी यांची उपस्थितांना माहिती दिली. त्याचबरोबर सदर माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन प्राचार्य व शिक्षक यांना करण्यात आले आहे.
पोलीस काका, पोलीस दीदींचे पोस्टर शाळेत लागणार..
शाळा, महाविद्यालयासाठी नेमणूक करण्यात आलेल्या पोलीस काका आणि पोलीस दीदी यांचा फोटो व संपर्क क्रमांक असलेले फलक प्राचार्य व शिक्षकांना पोलिसांनी दिले आहेत. सदरील फलक शाळा परिसरात व शाळा, कॉलेजच्या प्रथमदर्शनी लावण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींना व पालकांना असुरक्षिता वाटल्यास संपर्क करण्यासाठी मदत होणार आहे. Wagholi News :