गणेश सूळ
wagholi News : दौंड : देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे! घेता घेता एक दिवस , देणाऱ्याचे हात घ्यावे! या कवी विंदा करंदीकर यांच्या काव्याप्रमाने, भारतीय डाक विभागाच्या योजनांची तळागाळातील घटकांना माहिती व्हावी. यासाठी तळमळीने काम करणारे वाघोली येथील पोस्टमन नामदेव गवळी यांना सुकन्या समृद्धी योजनेमध्ये रिजन स्तरावर प्रथम पारितोषिक तसेच उत्कृष्टता पुरस्कार मिळाला आहे. (Postman Namdev Gawli of Wagholi was presented with a special merit award)
बाणेर रोडवरील यशदा सभागृहात झाला सोहळा
बाणेर रोडवरील यशदा सभागृहात हा पुरस्कार सोहळा बुधवारी (ता.३१) पार पडला. या सोहळ्यात
नामदेव गवळी यांना महाराष्ट्र आणि गोवा परिमंडलचे चीफ पोस्ट मास्तर जनरल किशन कुमार शर्मा यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.(wagholi News) यावेळी पुणे रीजनचे पीएमजी रामचंद्र जायभाये आणि पुणे विभागाच्या डीपीएस सिमरन कौर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोस्टमन नामदेव गवळी हे गेली आठ वर्षे वाघोली येथे पोस्टमन म्हणून कार्यरत आहेत. पत्र वाटपाबरोबरच ते विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. लोकांना पोस्टाची पर्यायाने पोस्टकार्डची आठवण राहावी. यासाठी लोकांना दरवर्षी एक हजार पत्र लिहितात.
वृक्षारोपणाचे आवाहन करण्यासाठी दरवर्षी दोन हजार पत्रे लिहितात. परिसरातील सिक्युरिटीजना रक्षाबंधनाला स्वखर्चातून राख्या वाटतात. (wagholi News) आर्थिक दुर्बल घटकातील सुमारे दोनशेच्यावर विद्यार्थ्यांना स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य पुरवतात.
एवढेच नाही तर वृद्धांना आणि गर्भवती महिलांना मोफत घरपोच सेवा पुरवतात. नुकतेच त्यांनी वाघोलीतील जिल्हा परिषद शाळा पूर्णतः सुकन्यामय केली. (wagholi News) प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पोस्टमनला गौरविण्यात आल्याने नागरिकांचा गवळी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Wagholi News : वाघोलीत प्रेयसीने चाकूने भोसकून केला प्रियकराचा खून!
Wagholi News : वाघेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात दर्शनासाठी जाताना शॉर्ट कपड्यांवर बंदी..!