योगीराज शिंदे
Wagholi News : लोणीकंद, (पुणे) : पुण्यातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. त्यात वाघोलीतही पावसाने रस्ते जलमय झाले. वाघोलीतील फुलमळा रस्त्यावर पावसाचे मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. या रस्त्यांना अक्षरशः नाल्याचे स्वरूप आले होते. त्यात मागील सहा वर्षांपासून स्व-खर्चाने आणि काही प्रमाणात ग्रामपंचायत व पुणे महापालिकेची मदत घेऊन हवेलीचे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अनिल सातव हे साठलेले पाणी काढत आहे. (Wagholi News)
कायमस्वरूपी ड्रेनेज लाईनसाठी ग्रामपंचायतीमार्फत काम सुरु केले होते. परंतु, स्थानिक अडचणींमुळे ते रखडले गेले आहे. तरी देखील कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मनपाकडे सातत्याने पाठपुरावा सुरूच आहे.
वाघोली फुलमळा रोडवरील पावसाचे पाणी मडपंपच्या माध्यमातून उपसा करण्यासाठी चेंबर व रस्ता खोदून पाईपलाईनचे पावसाळा पूर्व उपाययोजनेचे काम काही दिवसांपूर्वी आपण पुणे मनपा व स्वखर्चातून पूर्ण केले होते. काल रात्रीच्या पावसानंतर त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. त्यामुळे आज सकाळी पूर्व उपाययोजनेद्वारे मडपंप टाकून त्या पाण्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. (Wagholi News)
दरम्यान, या परिसरात हजारो लोक राहतात. पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक बनत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. (Wagholi News)