पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पुणे शहरातील माजी राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ अॅड. असिम सरोदे यांचा समावेश आहे. लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले असून, दोन ते पाच टप्प्यांतील मतदान होणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्रातील प्रचारासाठी ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.
या यादीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, विश्वजित कदम यांच्यासह शहरातील माजी राज्यमंत्री रमेश बागवे, ज्येष्ठ विचारवंत विश्वंभर चौधरी आणि विधिज्ञ अॅड. असिम सरोदे यांचा समावेश आहे.