उरुळी कांचन, (पुणे) : फुरसुंगी (ता. हवेली) येथील रहिवासी व उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यशवंत जगन्नाथ डोळस (वय – 57) यांचे शनिवारी (ता. 03) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले.
डोळस हे उरुळी कांचन येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा बजावत होते. मागील पाच महिन्यांपासून आजारी असल्याने त्यांनी कार्यालयीन कामकाजातील रजा घेतल्या होत्या. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर शनिवारी रात्री त्यांचे निधन झाले.
दरम्यान, डोळस यांनी वेल्हा, मावळ, व उरुळी कांचन येथे कर्तव्य बजावले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, जावई असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी (ता. 04) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास फुरसुंगी येथील गंगानगर परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.