उरुळी कांचन, (पुणे) : शिरूर – हवेली विधानसभेची निवडणूक ऐतिहासिक झाली. जनतेने निवडणूक हातात घेतल्याने नेते व कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून मला निवडून आणले. शिरूर व हवेलीतील मतदारांनी मोठी साथ देत पक्ष, गट-तट न पाहता मतदान केले. महायुतीच्या विचारांना ताकद देत निवडून दिले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा ऋणी असल्याचे प्रतिपादन शिरूर – हवेलीचे नवनिर्वाचित आमदार माऊली आबा कटके यांनी केले.
पूर्व हवेलीतील नायगाव – पेठ येथे रविवारी (ता. 01) आभार दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कटके बोलत होते. यावेळी हवेली तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, जिल्हा युवकाध्यक्ष आण्णासाहेब महाडिक, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, भाजप जिल्हाध्यक्षा पुनम चौधरी, सरपंच शोभा चौधरी, माजी सरपंच पल्लवी सुजित चौधरी, बापुसाहेब चौधरी, उद्योजक जी. बी.चौधरी, उद्योजक सुजित चौधरी, पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी, माजी उपसरपंच निलेश खटाटे, काळुराम चौधरी, थेऊर ग्रामपंचायतीचे सदस्य युवराज काकडे, सदस्य विजया चौधरी, लक्ष्मी गायकवाड, गणेश गायकवाड, तंटामुक्ती अध्यक्ष आकाश आढाव, योगेश चौधरी, रामभाऊ चौधरी, सचिन हाके, युवराज चौधरी, राजेंद्र चौधरी, अक्षय गायकवाड, पंडित चौधरी, दिपक चौधरी, सुशांत गुळुंजकर, राकेश चौधरी, सुजित हाके, प्रतीक चौधरी, रोहित शेलार व ग्रामस्थ, कामगार वर्ग युवक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
यापुढे बोलताना कटके म्हणाले, “निधी आणण्याचा धोरणात्मक निर्णयाद्वारे शिरूर – हवेली मतदारसंघात शाश्वत विकास साधण्यासाठी काय आणता येईल, याचा नेते व कार्यकर्त्यांनी अभ्यास करावा. शिरूर – हवेलीतील मतदारांनी मतदानरुपी आशीर्वाद देऊन ज्याप्रकारे लीड दिले त्या ऐतिहासिकरुपी शिरूर – हवेलीतील लहानात लहान गावांसाठी मोठा निधी देण्यासाठी महायुतीच्या माध्यामातून तत्पर असल्याचेही कटके म्हणाले.
दरम्यान, पेठचे माजी सरपंच सुरज चौधरी यांनी नायगाव पेठ, सोरतापवाडी, प्रयागधाम ग्रामस्थांतर्फे ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिर येथे आमदार माऊली आबा कटके यांच्या वजनाएवढे पेढे तुला करून नवसपुर्ती केली. त्यांच्या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे परिसरात कौतुक केले जात आहे.
https://www.instagram.com/reel/DDECwTxpBa2/?igsh=MWlhNWQ1bzdkc2Q2Mg==
उद्योजक सुजित चौधरी म्हणाले, “शिरूर हवेलीतील गोरगरीब जनतेसाठी परिसरात लवकरच आमदारांच्या मार्गदर्शनाखाली ‘माऊली वैद्यकीय मदत केंद्र’ उभारणार आहोत. शिरूर हवेली आमदारकीची पुढे जाऊन राजकीय समीकरणे जुळत गेली. वणवा पेटला आणि आमदारकीचा विजय खेचून आणला. नात्यागोत्यात गुंफलेले पेठ गाव येथील तरूणांचा शिरूर हवेली तालुक्यातील दांडगा जनसंपर्क तसेच सर्वगुणसंपन्न असे पेठ गाव विकासाच्या शिखरावर पोहोचले असुन अजित दादा पवार यांचेही गावावर असलेले लक्ष पुणे जिल्ह्यात एक आगळीवेगळी ओळख निर्माण केली आहे.”