(Video Viral )पुणे : पुणे शहरात भरस्त्यात जोडप्याचा बिनधास्त रोमान्स सुरु असल्यामुळे वाहतूक थांबली होती. वाहतूक पोलीस अन् जमलेली लोक त्या दोघांना आवरण्याचा प्रयत्न करत होते. परंतु एखाद्या चित्रपटाप्रमाणे रस्त्यात त्यांचा रोमान्स सुरु होता. या रोमान्सचा सध्या व्हिडीओ सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा..!
व्हिडिओमध्ये रस्त्यावर एक कपल एकमेकांना अलिंगन देताना दिसत आहे. यावेळी वाहतूकही ठप्प झाली. वाहतूक पोलिसही या दोघांना हटवण्याचा प्रयत्न करत आहेत.
तरी त्यांना त्याची चिंता नव्हती. लोक आपल्या गाड्यांमधून उतरुन त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. वाहतूक पोलीस आपला प्रयत्न करत होते. मात्र त्या दोघांना रोमान्स सुरुच आहे. परंतु रोमान्स करुन जसे काहीच झाले नाही, या पद्धतीने ते दोघे निघून गेल्याचे दिसत आहे.
दरम्यान, पुणे शहरातील सांस्कृतिक वातावरण बदलू लागले आहे. शहरातील बदलत जाणाऱ्या या संस्कृतीमुळे अनेक गार्डन अन् पर्यटन स्थळे लव्ह पाईंट झाली आहेत. आता हा व्हिडिओ पाहिल्यास हा प्रकार रस्त्यांवर सुरु झाला की काय? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. तर या प्रकाराबाबत सुज्ञ पुणेकर संताप व्यक्त करत आहेत.