डोर्लेवाडी (पुणे): डोर्लेवाडी (ता. बारामती) गावात डीजे बंदी, ट्रॅक्टरचे आवाज, बुलेटचा आवाज यावरती बंदी घालण्याचा ठराव करण्याबाबत ग्रामपंचायतीने रविवारी (ता. 26) आयोजित केलेली ग्रामसभा प्रामुख्याने वादळी ठरली. सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक झाली. यामुळे काहीकाळ वातावरण तणावाचे झाले होते. या ठरावांमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुप्रिया नाळे होत्या. यावेळी उपसरपंच राणी नेवसे, सदस्य बापूराव, निलाखे, प्रशांत जाधव, राहुल भोपळे, सुनिल म्हेत्रे, सुमित्रा वामन, रेखा नाळे, विद्या काळकुटे, तलाठी वंदना भगत, कृषिसहाय्यक बाजीराव कोळेकर, व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सत्ताधारी पार्टीच्या ग्रामस्थांनी महिला सरपंच आहेत याचं भान ठेऊन प्रश्न विचारा सरपंचांना जास्त प्रश्न विचारू नका असे म्हटले. यावेळी विरोधी पार्टीच्या ग्रामस्थांनी सरपंच यांस उलट-सुलट काय प्रश्न केले ते सांग. इथे दीडशे दोनशे लोक आहेत सांगायला आम्ही सरपंच यांना काय उलट बोललो ते सांगा. यावरून काही काळ वातावरण चांगलेच तापले व तणावाचे झाले होते. बाकी सर्व ग्रामस्थांनी मिळून दोन्ही पार्टीतील लोकांना समजून सांगून शांत केले. सरपंच व उपसरपंच वारंवार शांततेचे आवाहन करत होते. मात्र, ग्रामस्थ शांत रहात नव्हते.
ग्रामसभेत जय तुळजाभवानी मंदिर बंधने, डीजे आवाज, गावामध्ये भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरूंची माहिती ग्रामपंचायतला कळवणे, गावातील अनेक विकास कामाबाबत चर्चा झाली. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जालिंदर बालगुडे यांनी सभेचे कामकाज पाहिले. शासनाचा दुसरा अधिकारी नसल्याने सर्व जबाबदारी सरपंच यांच्यावर असल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे या सरपंच देत होत्या.
दरम्यान, 26 जानेवारी 2024 रोजी ग्रामरोजगार सेवक ठराव मंजूर झालेला असून देखील त्याबाबत प्रोसेडींग पूर्ण झालेले असून 26 जानेवारी रोजी ग्रामरोजगार सेवक पदासाठी अर्ज आल्याने या पदासाठी डबल ठराव करण्यासाठी ग्रामसभेत विषय घेऊन डबल ठराव करण्याची योजना करण्यात आली. परंतु मागील ग्रामरोजगार सेवक यांनी विचारले असता काम चालू असताना डबल ठराव कसा काय करत आहात पहिल्या ग्रामरोजगार सेवकाने राजीनामा न देता डबल ठराव का करत आहात असे ग्रामस्थांनी विचारले असता या ठिकाणी पुन्हा वातावरण तणावाचे झाले.
याबाबत बोलताना ग्रामस्थ ऍड अतुल भोपळे म्हणाले, गटातटाच्या राजकारणामुळे डोर्लेवाडी गावच्या विकास कामांना खिळ बसली आहे.