Vasantrao Naik : लोणी काळभोर, (पुणे) : महाराष्ट्र राज्याला ज्यांचे प्रदीर्घ नेतृत्व लाभले असे उत्कृष्ट प्रशासक, लोकप्रिय नेते, वंचितांचे उद्धारकर्ते, शेतकऱ्यांचे कैवारी तसेच महाराष्ट्र कृषी कृषी औद्योगिक क्रांतीचे नेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचा दिन म्हणजे कृषिदिन होय. त्यांच्या कार्यशैलीचा आदर्श नव्या पिढीने घ्यावा असे मत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी व्यक्त केले. (Vasantrao Naik)
आळंदी म्हातोबाची (ता. हवेली) येथे हरितक्रांतीचे जनक व महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासन – कृषि विभाग, कृषि विभाग जिल्हा परिषद पुणे- पंचायत समिती हवेली व तालुका कृषि अधिकारी कार्यालय, हवेली यांचे संयुक्त विद्यमाने कृषिदिनाचे शनिवारी (ता. ०१) आयोजन करण्यात आले होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार होते. यावेळी पवार बोलत होते. (Vasantrao Naik)
यावेळी गटविकास अधिकारी भूषण जोशी, तालुका कृषि अधिकारी मारुती साळे, माजी सभापती अनिल टिळेकर, कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार विजेते आप्पासाहेब काळभोर, उपसरपंच सुनिता संजय जवळकर, अरविंद शिवरकर, मनिषा भोंडवे, आळंदी म्हातोबा सदस्य दयानंद राजेंद्र शिवरकर, श्रीहरी सुरेश काळभोर, सोसायटीचे अध्यक्ष प्रकाश जवळकर, तुषार जवळकर, गणेश दिनकर जवळकर, शेतकरी मोठ्या बहुसंख्येने उपस्थित होते. Vasantrao Naik
सदर कार्यक्रमावेळी पीक स्पर्धा विजेते शेतकरी, शेतीनिष्ठ शेतकरी प्राप्त शेतकरी व कृषी यांत्रिकीकरणाअंतर्गत लाभ देण्यात आलेले विविध लाभार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व औषध फवारणी संरक्षक किटचे वाटप करण्यात आले. कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत अनुदानावर देण्यात आलेल्या विविध औजारांचे प्रदर्शन कार्यक्रम स्थळी आयोजित करण्यात आले. (Vasantrao Naik)
तालुका कृषि अधिकारी मारुती साळे यांनी महाराष्ट्र शासन – कृषि विभाग कडील डीबीटी विषयक योजना तसेच फळबाग लागवड, शेततळे, प्रक्रिया प्रकल्प याबाबत विविध योजना विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. पंचायत समिती हवेली कडील कृषि अधिकारी सुमित शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक यांच्या जीवन कार्याबद्दल माहिती देऊन त्यांचे कृषि व औद्योगिक क्षेत्रामधील योगदान विषद केले. मंडळ कृषि अधिकारी गणेश सुरवसे यांनी ऊस पिकाबाबत उत्पन्न वाढीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
कृषि संजीवनी सप्ताह दरम्यान शेतकऱ्यांना माहिती दिलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे करून सोलर पंप सारख्या नवनवीन योजना शेतकऱ्यापर्यंत पोहोचवाव्यात याबाबत सूचना दिल्या. कृषी विभागामध्ये कार्यरत असताना अधिकारी -कर्मचारी यांनी आपल्या कामामध्ये स्वतःला झोकून देऊन सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावा असे आवाहन केले.
दरम्यान, विविध पीक स्पर्धा विजेते शेतकरी, कृषिनिष्ठ शेतकरी, विविध योजनांचे लाभार्थी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी मंडळ कृषि अधिकारी गुलाब कडलग, ग्रामविकास अधिकारी पी. एस. पवार तसेच कृषि विभागाकडील कृषी पर्यवेक्षक मेघराज वाळुंजकर, सौरभ जाधव, कृषि सहाय्यक, आळंदी म्हातोबाची रामदास डावखर, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी हडपसर व वाघोली अधिनस्त सर्व कृषि पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांच्यासोबतच परिसरातील प्रगतशील शेतकरी बंधु-भगिनी मोठ्या उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळ कृषि अधिकारी गुलाब कडलग यांनी केले व आभार प्रदर्शन अब्दुल रझाक मुल्ला यांनी केले.