Vande Bharat Express : पुणे ते सोलापूर व सोलापूर ते पुणे दरम्यान ‘वंदे भारत’ रेल्वेच्या ‘एसी चेअर’ कार आणि ‘एक्झिक्युटिव्ह क्लासेस’च्या तिकीट दरांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याच्या निर्णयाचा फायदा ‘वंदे भारत’ने प्रवास करणाऱ्यांना मिळू शकतो. या मार्गावर प्रवाशांचा प्रतिसाद ३० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे.(Vande Bharat Express)
एक्झिक्युटिव्ह क्लासेस’च्या तिकीट दरांमध्ये २५ टक्क्यांपर्यंत कपात.
रेल्वे बोर्डाने ५० टक्क्यांपेक्षा कमी प्रतिसाद असलेल्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासेसच्या गाड्यांच्या तिकीट दारांमध्ये २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण मार्गाबरोबरच अंतर्गत स्टेशनमधील प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्या ठिकाणी सवलत लागू करता येऊ शकते, असे रेल्वे बोर्डाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे. पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या रेल्वेच्या एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासेसच्या गाड्यांना मोठा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.(Vande Bharat Express)
मात्र, सोलापूर ते मुंबई व मुंबई ते सोलापूर दरम्यान धावणाऱ्या ‘वंदे भारत’ला ८० टक्क्यांपेक्षा जास्त प्रतिसाद आहे. हा प्रतिसाद फक्त पुणे ते मुंबई दरम्यान सर्वाधिक आहे. सोलापूर ते पुणे दरम्यान गाडीला कमी प्रतिसाद असल्याचे दिसून आले आहे. गेल्या पाच महिन्यातील ‘वंदे भारत’ची प्रवासी संख्या पाहिली असता ही बाब दिसली आहे.(Vande Bharat Express)
दरम्यान, पुणे ते सोलापूर आणि सोलापूर ते पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वे बोर्डाने लागू केलेल्या २५ टक्के सवलतीचा लाभ मिळू शकतो, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.