(Uruli kanchan) उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) येथील श्री काळभैरवनाथ नवयुवक संघ आयोजित एक गाव एक शिवजयंती या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात एकूण १२२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यामध्ये १०९ पुरुष आणि १३ महिलांनी सहभाग घेतला.
विश्वराज हॉस्पिटल तर्पण ब्लड बँक लोणी काळभोर यांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबीर शनिवारी (ता. ११) नायगाव ग्रामपंचायत हद्दीत पार पडले. यावेळी हॉस्पिटल मधील अभय जगदाळे, नेहा कुलकर्णी, विकास कांबळे यांनी सहकार्य केले.
दरम्यान, छत्रपतींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही समाजाचे काहीतरी देणं लागतो या विचारातून नायगाव येथील तरुणांनी उस्फूर्तपणे रक्तदान शिबिरास प्रतिसाद दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
नायगाव पेठ येथील अल्ट्राटेक सिमेंट बल्क कंपनीच्या वतीने सडक सुरक्षा सप्ताहाचे आयोजन..!
नायगाव येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा बनला पोलीस उपनिरीक्षक
तरडे येथील मोबाईल चोरटा नायगावात पकडला ; लोणी काळभोर पोलिसांचे नागरिकांना आवाहन..!