उरुळी कांचन, (पुणे): शिंदवणे (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कंझार भट परिसरात उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकून तब्बल लाखो रुपयांची तयार दारू जप्त करण्यात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील एक महिन्यापूर्वी उरुळी कांचन पोलिसांनी एका दारूच्या अड्ड्यावर धडक कारवाई करत जागेच्या मालकावर गुन्हा दाखल केला होता. सदर जागेच्या मालकाचा दारूशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसताना गुन्हा दाखल केल्याने त्या जागा मालकाला २० दिवस जेलची हवा खावी लागली.
या जागा मालकाची उरुळी कांचनजवळ असलेल्या शिंदवणे ग्रामपंचायत हद्दीतील कंझार भट परिसरात शेती आहे. या शेतीच्या ठिकाणी ते अधूनमधून जात असतात. मागील काही दिवसांपूर्वी उरुळी कांचन पोलिसांनी कंझार भट परिसरात एका गावठी दारूच्या भट्टीवर कारवाई करून मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर दारूच्या भट्टीची जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार सदर जागेमालाकास २० दिवस जेलची हवा खावी लगली होती.
या ठिकाणी परिसरातील अनेक शेतकरी शेती करतात. तसेच मुळा -मुठा कॅनाल असल्याने पाण्याच्या शेजारी ऊसाची लागवड केलेली आहे. शेतकरी घरी गेल्यानंतर या परिसरातील दारू विक्रेते त्यांच्या शेतात तयार दारू ठेवत असलेली बाब उघडकीस आली आहे. याबाबत शेतकऱ्यानी दारू विक्री करणाऱ्याला जाब विचारला असता शेतकऱ्यांना दमदाटी व शिवीगाळ करण्यात येत असल्याची महिती समोर येत आहे.
View this post on Instagram
दरम्यान, जागेचे मालक यांनी वारंवार मी दोषी नसल्याचे उरुळी कांचन येथील पोलीस अधिकाऱ्यांना सांगितले होते. यावेळी सदर जागा मालक हे जेलमध्ये असतानाही या ठिकाणी दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस पथकानी त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता शेतात लाखो रुपयांची तब्बल ४ हजार ५०० लिटर तयार दारू मिळून आली. याप्रकरणी त्या ठिकाणी असलेली सर्व दारू उरुळी कांचन पोलिसांनी जप्त केली असून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलीस या आरोपीवर काय कारवाई करणार? याकडे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.