उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन, (पुणे) : मागील पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या खामगाव टेक (ता. हवेली) येथील १० वर्षाच्या मुलीचा शोध घेण्यास उरुळी कांचन पोलिसांना यश आले.
सदर आरोपी व मुलगी या दोघांनाही उरुळी कांचन पोलिसांनी औरंगाबाद जिल्ह्यातून ताब्यात घेतले असून मुलगी सुखरूप असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळत आहे.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाडुळे व त्यांच्या पथकाने हि कामगिरी केली आहे.
दरम्यान, आरोपीला घेऊन पोलीस पथक औरंगाबाद या ठिकाणावरून निघाले असल्याची माहिती मिळाली आहे.