Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापुर (ता. हवेली) येथील न्यू इंग्लिश स्कूलचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.९० टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांनी दिली. (Shilpa Tambe, a student of New English School, Ashtapur, secured 92 percent marks; The total result of the school is 98.90 percent..)
विद्यालयाचा एकूण ९८.९० टक्के निकाल..
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Uruli Kanchan News) विद्यालयातील ९१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ९० विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम शिल्पा बाळू तांबे ९२.४० टक्के, द्वितीय आर्यन संतोष चंदनशिव ८३.६०, तृतीय तन्वी रामदास कोतवाल ८२.८० टक्के, चतुर्थ अनुष्का दत्तात्रय कोतवाल ८२.२०, व प्रतीक्षा पांडुरंग कोतवाल ७९.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
७५ टक्के व त्यापेक्षा पेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – १६, ६० टक्के व त्यापेक्षा अधिक गुण मिळालेले विद्यार्थी – ३२, ६० टक्के पेक्षा कमी मिळालेले विद्यार्थी – ४२
दरम्यान, सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष विजयदादा कोलते, सचिव शांताराम पोमण, शाळा समिती अध्यक्ष श्रीहरीदादा कोतवाल, सुभाषआप्पा जगताप, रमेश कारभारी कोतवाल, सरपंच अश्विनीताई कोतवाल, उपसरपंच सोमनाथ कोतवाल,नितीन मेमाणे, तयाजीबापू जगताप, विजय कोतवाल, सर्व सल्लागार समिती सदस्य व मुख्याध्यापक शिवाजी घोगरे यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. (Uruli Kanchan News)