Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६.२० टक्के लागल्याची माहिती महाविद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी दिली. (Pratiksha Mahadik of Sant Yadavbaba Vidyalaya, Shindwane secured 95 percent marks; The total result of the school is 96.20 percent..)
७६ विद्यार्थी पास
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला.(Uruli Kanchan News) विद्यालयातील ७९ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ७६ विद्यार्थी पास झाले आहेत.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम प्रतीक्षा बबन महाडिक, ९५.४० टक्के, द्वितीय ऋतुजा आप्पा कुंजीर, ८८.८० टक्के, तृतीय श्रुष्टी राजाराम शिंदे, ८८.६०, चतुर्थ सुषमा उमेश घोलप, ८८.४०, व पायल जालिंदर कुंजीर, ८८ टक्के, गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक सुरेश कांचन, संस्थापक अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव सर्व संचालक, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.(Uruli Kanchan News) तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.