Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य शाखेचे उद्घाटनउरुळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडी या तीन गावच्या हद्दीत झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करून आपल्याला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष भगवानराव वैराट यांनी दिले. (Uruli Kanchan News)
पुणे – सोलापूर रोडवरील डोलारे वस्ती, गिरमे वस्ती, चौधरी माथा परिसरात महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्य शाखेचे उद्घाटन बुधवारी (ता. २१) वैराट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वैराट बोलत होते. (Uruli Kanchan News)
यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महंमदभाई शेख, राज्य सरचिटणीस दत्ताभाऊ कांबळे, राज्य संघटक आबासाहेब चव्हाण, पथारी सुरक्षा दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आबासाहेब शिंदे, जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ डाडर, पुणे शहर कार्याध्यक्ष सुरेश धिवार, पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सुनील भिसे, वरिष्ठ उपाध्यक्ष, गणेश लांडगे, पथारी सुरक्षा दलाचे पुणे शहर अध्यक्ष प्रदिप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. (Uruli Kanchan News)
आबासाहेब चव्हाण म्हणाले, “सदर झोपडपट्टी वसाहत दहा कुटुंबांमध्ये आहे गेली ४० वर्षे रहात असुन ती झोपडपट्टी उरुळी कांचन, शिंदवणे, सोरतापवाडी या तीनही ग्रामपंचायत हद्दीजवळ असुनही त्यांच्या मुलभूत हक्कापासून वंचित ठेवले आहे. त्यांना रेशनकार्ड, वीज, मतदान कार्ड, आधार कार्ड ह्यापैकी कोणतीही सुविधा नाहीत. त्यांना सुविधा मिळवून देण्याची मागणी यावेळी चव्हाण यांनी भगवानराव वैराट यांच्या कडे केली.” (Uruli Kanchan News)
यावेळी संघटनेचे पदाधिकारी, दत्ताभाऊ कांबळे, दत्ताभाऊ डाडर, आबासाहेब शिंदे, सुरेश धिवार, सुनील भिसे, गणेश लांडगे यांनी मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला स्थानिक पाहुणे म्हणून अजिंक्य कांचन रेल्वे क्षेत्रिय समितीचे सदस्य, भाजपा शहराध्यक्ष अमित कांचन, उपाध्यक्षा पुजा सणस, भाजप युवा मोर्चा, उपाध्यक्ष खुशाल कुंजीर, गणेश घाडगे, करण धुमाळ हे उपस्थित होते. (Uruli Kanchan News)
दरम्यान, राज्य पदाधिकारी जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शाखा उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाखेचे पदाधिकारी अध्यक्ष भारत डोलारे, खजिनदार विनोद डोलारे, उपाध्यक्ष अमित हटकर, कोंडिबा डोलारे, सुमित हटकर यांनी ही संघटना स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक, व आभार आबासाहेब चव्हाण यांनी मानले. (Uruli Kanchan News)