Uruli Kanchan News : उरुळी कांचन : सध्या ऑनलाईनच्या युगात अनेक व्यवहार डिजिटली होताना दिसत आहेत. त्यातून सायबर क्राईममध्येही वाढ होत आहे. त्यात भारतातील सर्वात मोठा शोभिवंत रोपवाटिकेचा हब अशी ओळख असलेल्या पूर्व हवेलीतील नर्सरी उद्योग आता सायबर चोरट्यांच्या रडारवर आल्याचे दिसत आहे. हे सायबर चोरटे व्यापाऱ्याला फसवण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, सतर्कतेमुळे हा प्रकार समोर आला आहे.
सायबर चोरट्यांनी ग्राहक बनून फेक एसएमएस मोबाईलवर नर्सरी उद्योजकाला पाठवला. त्यात माल खरेदी करावयाचा म्हणत नर्सरी उद्योजकांना मोह दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न होता. पूर्व हवेली तालुक्यात नर्सरी उद्योगातून देशभरातून रोपवाटिकांची मागणी आहे. (Uruli Kanchan News) त्यासाठी काही ग्राहक हे आगाऊ माल खरेदी करण्यासाठी नर्सरी व्यवसायिकांना ऑनलाइनद्वारे पैसे पाठवत असतात. याच पद्धतीचा वापर काही दिवसांपासून सायबर चोरटे हे करत असून, नर्सरी व्यावसायिकांना माल खरेदी करण्याच्या उद्देशाने अकांऊटची माहिती टाकून पैसे टाकल्याचे फेक एसएमएस पाठवत आहे.
अशी करतात फसवणूक
या प्रकारात सायबर चोरटे हे पहिल्यांदा ग्राहकाला फोन करुन माल खरेदी करावयाचा आहे हे सांगत आहे. त्यानंतर काही किरकोळ रक्कम अकांऊटवर टाकत आहे. संपूर्ण मालाची रक्कम विचारल्यानंतर ती रक्कम पाठवयाच्या ऐवजी अगाऊ स्वरुपाचा फेक पैसे पाठविल्याचा बँकेच्या खात्याशी जुळणारा तंतोतंत फेक एसएमएस पाठविला जात आहे. (Uruli Kanchan News) परत रक्कम जास्त आली म्हणून पैसे माघारी पाठवताय का? म्हणून नर्सरी व्यावसायिकाकडून सायबर चोरटे हे पैसे खात्यावर मागून घेऊन फसवणूकीचा प्रयत्न करीत आहे.
पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, आळंदी म्हातोबासह इतर भागात घटना
काही सायबर चोरटे असे फेक एसएमएस करुन व्यावसायिकांना गंडा घालण्याचा प्रयत्न करीत आहे. पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, आळंदी म्हातोबा, कुंजीरवाडी, कोरेगावमूळ, नायगाव परिसरातील नर्सरी व्यावसायिकांना हे सायबर चोरटे फसवणूकीच्या मोहात अडकवत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : नायगाव येथे पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या..