Uruli Kanchan News उरुळी कांचन, (पुणे) : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी भाऊसाहेब लक्ष्मण कांचन यांची सोमवारी (ता. १९) बिनविरोध निवड करण्यात आली आहे. (Uruli Kanchan News)
उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र बबन कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उरुळी कांचनच्या मंडल अधिकारी नूरजहाँ सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. सरपंच पदासाठी भाऊसाहेब कांचन यांचा एकमेव अर्ज आल्याने नूरजहाँ सय्यद यांनी भाऊसाहेब कांचन यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
भाऊसाहेब कांचन यांची सरपंचपदी निवड होताच कार्यकर्त्यांनी साजरा केला जल्लोष
दरम्यान, शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून भाऊसाहेब कांचन यांची ओळख आहे. भाऊसाहेब कांचन यांची बिनविरोध निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलाल व फटाक्यांच्या आतिषबाजी करीत मोठा जल्लोष करण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, माजी सदस्य संतोष आबासाहेब कांचन, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, मनिभाई देसाई पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कांचन, मावळते सरपंच राजेंद्र कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, उपसरपंच अनिता तुपे, माजी उपसरपंच अनिता बगाडे, संचिता कांचन, ग्रामपंचायत सदस्य अमित (बाबा) कांचन, मयूर कांचन, मिलिंद जगताप, सुनिल तांबे, शंकर बडेकर, सदस्या ऋतुजा कांचन, प्रियांका कांचन, सिमा कांचन, स्वप्नीशा कांचन, सुजाता खलसे, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निवडीनंतर ”पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले कि, नवनिर्वाचित सरपंच भाऊसाहेब कांचन म्हणाले, “उरुळी कांचन गावच्या विकासासाठी गट-तट बाजूला ठेवून गावच्या विकासावर लक्ष केंद्रित करणार आहे. उरुळी कांचन गावासाठी राहिलेल्या उर्वरित कामासाठी वाढीव निधी मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तसेच उरुळी कांचनसह परिसरातील मान्यवरांसह सर्व सदस्यांना बरोबर घेऊन राहिलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच सरकारी दवाखान्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी तत्पर असणार आहे.