उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आखिल तळवाडी मित्र मंडळाचा श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावर्षी दहीहंडी फोडण्याचा मान पिंपळगाव येथील श्री सिद्धेश्वर गोविंदा पथकाने पटकविला. येळी विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसह पंचक्रोशीतील तरुणाई सहभागी झाली होती.
उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतिल अखिल तळवाडी दहीहंडी महोत्सव सालाबाद प्रमाणे सलग २१ व्या वर्षापासून मंडळाकडून दहीहंडी उत्सव साजरा केला जातो. यावेळी हजारो नागरिकांनी गोपाळ काल्याचा व सोहळ्याचा आनंद लुटला.
या वर्षी आखिल तळवाडी मंडळाने पुतना वध देखावा सादर केला होता. यावेळी डीजेच्या लावण्यावर व गाण्यावर गोपालभक्तानी व महिलानी कार्यक्रमाचा आनंद लुटला. या दहीहंडीत अनेक संघानी सहभाग नोदंवला होता. यावेळी श्री सिद्धेश्वर गोविंदा पथकाने पाच थर लावून ५१ हजार १८८ रुपयांचे रोख रक्कम व चषक पटकाविले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल बाबुराव पाचर्णे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक शिवशांत खोसे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य संतोष कांचन, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, माजी उपसरपंच सुनिल कांचन, युवराज कांचन सदस्य अमित (बाबा) कांचन, मंडळाचे अध्यक्ष अनिल कांचन, कार्यकर्ते राजू काळे, भरत काळे, भाऊ कुंजीर, सोमा तावरे, जयेश कांचन, राजू शेख, अक्षय (बंटी) कांचन, आदेश कांचन, आशितोष कांचन, संदीप कांचन, ओंकार रानवडे, सुशांत कुंजीर, सुनिल लिंभोरे यांनी मोलाचे सहकार्य केले.