उरुळी कांचन, (पुणे) : कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या रिलायन्स जिओ या मोबाईल टॉवरच्या ७५ हजार रुपये किमतीच्या ५ बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी गणेश बाळासो काकडे (वय 30, रा. वरवंड रोड ता. दौंड) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव मुळ गावच्या हददीतील जमीन गट नं 4 या ठिकाणी रिलायन्स जिओ या कंपनीचा मोबाईल टॉवर आहे. या ठिकाणी असलेले लोखंडी पेटीचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. त्या ठिकाणी असलेल्या ७५ हजार रुपये किमतीच्या ५ बॅटऱ्या चोरून नेल्या.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार भोसले पुढील तपास करत आहेत.