Monday, May 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Uruli kanchan : नायगाव गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींना नाशिकमधून बेड्या; एका अल्पवयीन सह चौघांचा समावेश, उरुळी कांचन व स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कामगिरी..

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Friday, 27 March 2026, 7:47

Uruli kanchan : नायगाव (ता. हवेली) येथील कबीर चायनीज हॉटेलमध्ये गावठी पिस्तूलने गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील दोन मुख्य फरार आरोपींना जेरबंद करण्यात उरुळी कांचन व स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखेच्या पोलिसांना यश आले आहे.

 

सिद्धार्थ गोविंद कांबळे (वय – 28, रा. कोरेगाव मूळ) आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे (वय- 20 रा. उरुळी कांचन) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत आरोपींकडून दोन गावठी अग्निशस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, फिर्यादी मिलिंद बापू शेलार (वय 38, रा. नायगाव) हे कबीर चायनीज हॉटेलमध्ये असताना एका दुचाकीवरून तीन अनोळखी इसम तेथे आले. त्यातील एकाने पाण्याची बाटली मागण्याच्या बहाण्याने फिर्यादीवर पिस्तूल रोखून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला होता यावेळी या घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. ज्याबाबत 12 फेब्रुवारी 2026 रोजी उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली दोन स्वतंत्र तपास पथके तयार करण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी यापूर्वीच नवनाथ आनंदा घुले (वय 28, रा. दहीटणे) याला अटक केली असून एका विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले होते.

तपासादरम्यान मुख्य सूत्रधार सिद्धार्थ गोविंद कांबळे आणि संग्राम हरिश्चंद्र हुलगे हे नाशिक परिसरात लपून बसल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले.

दरम्यान, त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता फिर्यादी आणि आरोपी सिद्धार्थ कांबळे यांच्यात जुना जमिनीचा वाद होता. याच वादातून सिद्धार्थने इतर आरोपींच्या मदतीने हा कट रचला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. अटक आरोपी यांना न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी रिमांड घेऊन अधिक सखोल तपास करण्यात येत आहे.

सदर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, यांचे नेतृत्वाखाली पोलीस उप-निरीक्षक मीरा मटाले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार योगेश नागरगोजे, राजु मोमिन, भारत मोहोळ, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सचिन जगताप, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, अजित काळे, सुमित वाघ, सोमनाथ सुपेकर यांचे पथकाने केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक प्रविण कांबळे हे करीत आहे.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

Monday, 4 May 2026, 12:43

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Monday, 4 May 2026, 12:39

Salman Khan News : सलमान खानवर हल्ल्याचा कट? बॉडीगार्डचा कोर्टात धक्कादायक खुलासा

Monday, 4 May 2026, 11:53
Central state minister Murali Mohol in CM Race buzz is going on

Maharashtra Olympic Association : महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड ; बालेवाडीतील सर्वसाधारण सभेत शिक्कामोर्तब..

Monday, 4 May 2026, 11:45

Sunetra Pawar : बारामतीत सुनेत्रा पवारांची विजयाकडे वाटचाल; कार्यकर्त्यांना जल्लोष न करण्याचे आवाहन ; “हा विजय अजितदादांच्या स्मृतींना समर्पित”- सुनेत्रा पवार भावूक

Monday, 4 May 2026, 11:18

Baramati News : आंतरजिल्हा दुचाकी चोराला बेड्या ; सोलापूर जिल्ह्यातील आरोपीसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश ; बारामती शहर पोलिसांची कामगिरी

Monday, 4 May 2026, 11:06
Next Post
Crime

Crime : बाप की सैतान ! चोरीच्या संशयावरून पोटच्या मुलींना रात्रभर उलटे टांगले; 10 वर्षांच्या मुलींचा तडफडून मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.