Baramati News : बारामती, (पुणे) : बारामती शहर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. आरोपीकडून बारामती शहर, तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चोरीच्या चार दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. ऋषिकेश पिंटू मंडले (रा. निरजणी, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. Baramati News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचातपास सुरू असताना पोलीस हवालदार यशवंत पवार यांना चोरीच्या मोटारसायकलींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आरोपी ऋषिकेश मंडले याला ताब्यात घेतले. Baramati News

आरोपी ऋषिकेशची सखोल चौकशी केली असता, या चोरीत एका अल्पवयीन मुलाचा (विधी संघर्ष बालक) सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीने चोरलेल्या गाड्या वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या. पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून
यामाहा कंपनीची RXG मोटारसायकल, हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल, यामाहा कंपनीची दुसरी एक मोटारसायकल, होंडा कंपनीची ॲक्टिवा स्कुटी, दुचाकी जप्त केली आहेत. Baramati News
दरम्यान सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तपास पथकातील यशवंत पवार, अक्षय सिताफ, रामचंद्र शिंदे, अमोल देवकाते, गिरीश नेवसे, पोपट कवितके, विशाल शिंदे, सागर जामदार आणि संदीप जाधव यांनी ही मोहीम फत्ते केली. तपासाचे मार्गदर्शन पीएसआय रत्नदीप भंडारे यांनी केले. Baramati News







