Wednesday, May 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vaishali Murlidhar Totewar : एपीआय वैशाली तोटेवार निलंबित होणार ; पोलीस आयुक्तांकडून कार्यमुक्तीचा आदेश रद्द, बढतीवर बदली झाली असतानाही 28 लाखांची मागितली होती लाच..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 May 2026, 12:39

Vaishali Murlidhar Totewar : पुणे, : आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना तक्रारदाराची जमीन मिळवून देण्यासाठी 28 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या सहायक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार (वय ४९) यांच्यावर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. तोटेवार यांची पोलीस निरीक्षकपदी बढतीवर बदली झाली होती, मात्र तांत्रिक बाबी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांनी लाच घेतल्याने त्यांचा कार्यमुक्तीचा आदेश रद्द करून त्यांना निलंबित केले जाणार आहे. Vaishali Murlidhar Totewar

 

तक्रारदार यांच्या अर्जावर वैशाली तोटेवार या तपास करत होत्या. या प्रकरणातील आरोपींविरुद्ध कारवाई करून तक्रारदाराची जमीन परत मिळवून देण्यासाठी त्यांनी एकूण 30 लाखांची मागणी केली होती. यातील 2 लाख रुपये त्यांनी आधीच स्वीकारले होते. उर्वरित 28 लाख रुपये स्वीकारण्याचे त्यांनी मान्य केले होते. Vaishali Murlidhar Totewar

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) 2 मे रोजी बंडगार्डन रोडवरील हॉटेल कॉनराडच्या गेटसमोर सापळा रचला होता. तोटेवार यांच्या सांगण्यावरून खासगी व्यक्ती संभाजी शिवाजी चव्हाण (वय ४७, रा. सदाशिव पेठ) याने 28 लाख रुपये स्वीकारले. पैसे स्वीकारताच एसीबीने दोघांनाही ताब्यात घेतले. Vaishali Murlidhar Totewar

वैशाली तोटेवार यांची लोहमार्ग, मुंबई येथे पोलीस निरीक्षकपदी बदली झाली होती. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांना कार्यमुक्त करण्याचा आदेशही काढला होता. मात्र, प्रलंबित प्रकरणे हस्तांतरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होण्याऐवजी तोटेवार यांनी लाचेचे व्यवहार केले. यामुळे संतापलेल्या पोलीस आयुक्तांनी आता तोटेवार यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. Vaishali Murlidhar Totewar

एसीबीची कारवाई आणि कोठडी
एसीबीने आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सर्च ऑपरेशन करून लाच संबंधित प्रकरणाची फाईल जप्त केली आहे. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ६ मे पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. वैशाली तोटेवार या मूळच्या नागपूरच्या असून त्या सध्या स्वारगेट पोलीस लाईनमध्ये राहत होत्या. कार्यमुक्त करण्याचा मेमो खिशात असतानाही लाचेची भूक न शमलेल्या या महिला अधिकाऱ्याच्या कृत्यामुळे पुणे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, या कारवाईमुळे लाचखोर अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. Vaishali Murlidhar Totewar

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

attempt-to-drive-away-a-man-on-suspicion-of-having-an-affair-with-his-wife

Pune Murder Case : पुण्यात किरकोळ वादातून तरुणाची निर्घृण हत्या; चार अल्पवयीन ताब्यात

Wednesday, 6 May 2026, 13:11

Katraj News : भिंतींच्या अरुंद फटीत अडकलेल्या चिमुकल्याची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका

Wednesday, 6 May 2026, 12:58
Youth cheated for 99 lakh in pimpri chinchwad Pune

Pune Cyber ​​Fraud : डेटिंग ॲप, शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने दोघांची तब्बल 20 लाखांहून अधिकची फसवणूक

Wednesday, 6 May 2026, 12:16

Pune Good News : पुण्यातील गरजू, वृद्ध व अनाथांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे सन्मानपूर्वक वाटप, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा आदर्श उपक्रम

Wednesday, 6 May 2026, 12:06
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune News : पुण्यात ९ वर्षीय मुलीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी वृद्धाला अटक

Wednesday, 6 May 2026, 11:01

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

Tuesday, 5 May 2026, 20:00
Next Post

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.