Tuesday, July 28, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor : ‘गोल्डन 50’चा जल्लोष! लोणी काळभोर येथील जयहिंद हायस्कूलच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा संस्मरणीय सोहळा उत्साहात संपन्न

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 4 May 2026, 12:43

Loni Kalbhor  लोणी काळभोर, ता. 4 : आयुष्याच्या अर्धशतकाचा टप्पा पार करत जुन्या मैत्रीच्या आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा अनोखा सोहळा लोणी काळभोर येथे रंगला. जयहिंद हायस्कूलच्या सन 1990-91 च्या दहावीच्या वर्गातील माजी विद्यार्थ्यांनी वयाची ‘५०’ वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद ‘गोल्डन 50’ या विशेष उपक्रमातून उत्साहात साजरा केला. तब्बल तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेक भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. Loni Kalbhor

कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील मधुबन कार्यालयात शनिवारी (ता. 2) हा भव्य मेळावा पार पडला. सुरुवातीलाच केक कटिंग करून ‘गोल्डन 50’चा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यानंतर नृत्य सादरीकरण, मिमिक्री, गायकांचे सादरीकरण, तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमादरम्यान अनेकांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणी सांगत हशा आणि भावनांचे क्षण निर्माण केले. Loni Kalbhor

या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त मनोरंजनच नव्हे, तर परस्परांतील स्नेह अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात आला. विविध मनोरंजक खेळ, गप्पा-गोष्टी आणि आठवणींचा खजिना उघडत उपस्थितांनी एकमेकांशी पुन्हा नवे बंध जुळवले. “जुनं ते सोनं” ही उक्ती यावेळी अक्षरशः अनुभवायला मिळाली. Loni Kalbhor

 

या कार्यक्रमाचे नियोजन सुनीता तिवारी, अमोल दुगाणे, धनंजय आवारे, किशोर आणि अविनाश टिळेकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केले होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत आणि यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमाला शिवदास काळभोर, चित्तरंजन गायकवाड, नंदू काळभोर यांच्यासह जयहिंद हायस्कूलचे माजी प्राचार्य स्व. सुळगेकर सर यांचे सुपुत्र सागर सुळगेकर उपस्थित होते. त्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत माजी विद्यार्थ्यांच्या एकोप्याचे अभिनंदन केले. Loni Kalbhor

दरम्यान, या संस्मरणीय मेळाव्यामुळे केवळ जुन्या आठवणींना उजाळा मिळाला नाही, तर भविष्यातही अशाच प्रकारे एकत्र येण्याचा निर्धार माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. लोणी काळभोर परिसरात या अनोख्या ‘गोल्डन 50’ सोहळ्याची जोरदार चर्चा रंगली आहे. Loni Kalbhor

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांनो पाणी साठवून ठेवा! लष्कर जलशुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद

Monday, 27 July 2026, 22:59

पुण्याच्या माॅडेल कॉलनीत धाडसी चोरी! घराचे कुलूप तोडून डिजिटल लॉकर फोडत ९ लाखांचे सोने लांबवले

Monday, 27 July 2026, 22:14

वाळूचे वाहन सोडण्यासाठी मागितली लाच; वनपाल आणि वनरक्षकाला एसीबीने रंगेहात ठोकल्या बेड्या!

Monday, 27 July 2026, 21:10

वडिल मरणाच्या दारात असताना मुलगा करत होता मोबाईलमध्ये शुटिंग! ससून रुग्णालयातील विचित्र प्रकार…

Monday, 27 July 2026, 20:20

प्रेयसीच्या मदतीने मित्राचा खून! मृतदेह पोत्यात भरून झुडपात फेकला, अवघ्या काही तासांत पोलिसांनी उकलले गूढ

Monday, 27 July 2026, 19:43

MPSC पेपरफुटीसंदर्भात रोहित पवारांनी घेतली तुकाराम मुंढेंची भेट; चौकशीचे निवेदन

Monday, 27 July 2026, 19:24
Next Post

Daund Crime : दौंडमध्ये मध्यरात्री थरार! तरुणावर कुऱ्हाडीने सपासप वार; आरोपी जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.