Daund Crime दौंड, ता. 4 : दौंड शहरातील संभाजीनगर परिसरात एका तरुणावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना रविवारी (ता.३) रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. Daund Crime

राहुल गायकवाड असे जखमी झालेल्याचे नाव आहे. तर शाहीद मेहमूद शेख (रा. भीमनगर, दौंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोनी शाम जाधव (वय 30, रा. गोवागल्ली, संभाजीनगर, दौंड) यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. Daund Crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोनी जाध या मावशी यलोबाई व भाऊ राहुल कुमार गायकवाड यांच्यासोबत रात्री सुमारे 12.15 वाजण्याच्या सुमारास घरासमोर बसून गप्पा मारत होत्या. याच वेळी आरोपी शाहीद शेख हा पाठीमागून आला आणि कोणतीही पूर्वसूचना न देता राहुल गायकवाड यांच्यावर कुऱ्हाडीने डोक्यावर सपासप वार केले.
या हल्ल्यात राहुल गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109(1), 351(3), 352 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करत आहेत.







