Saturday, June 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रेयसीच्या प्रेमात पत्नीला विसरला पती; दोन मुलांच्या आईचा शारीरिक व मानसिक छळ, पतीविरुद्ध गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 6 June 2026, 19:29

हडपसर, ता. ६ : शिक्षणासाठी पुण्यात स्थलांतर केल्यानंतर पतीचे दुसऱ्या महिलेशी संबंध जुळल्याचा संशय व्यक्त करत पत्नीला वारंवार मारहाण, शिवीगाळ आणि मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन मुलांचा सांभाळ करण्यासाठी घरकाम करून संसार चालवणाऱ्या महिलेने अखेर काळेपडळ पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पिसोळी येथील 34 वर्षीय महिलेने यांनी फिर्याद दिली असून, त्यानुसार त्यांचे पती गजानन बाबूराव चव्हाण (वय ४०, रा. पुसद, जि. यवतमाळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा विवाह २९ एप्रिल २००८ रोजी गजानन चव्हाण यांच्यासोबत झाला होता. त्यांना 17 आणि 16 वर्षाची अशी दोन मुले आहेत.

विवाहानंतर पुसद येथे वास्तव्यास असताना पती घरगुती कारणांवरून वारंवार मारहाण व शिवीगाळ करत असल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. तसेच, दोघांनी कष्टाने उभे केलेले जुने घर विकून नवीन बंगला घेण्याचे आश्वासन देत पतीने तो बंगला स्वतःच्या भावाच्या नावावर केल्याचाही आरोप महिलेने केला आहे. याबाबत जाब विचारल्यावर पतीकडून मारहाण होत असल्याचे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

 

दरम्यान, मोठ्या मुलाच्या शिक्षणासाठी ऑगस्ट २०२५ मध्ये हे कुटुंब पुण्यातील पिसोळी येथे राहण्यास आले. सुरुवातीला वेल्डिंगचे काम करणारे गजानन चव्हाण नंतर स्विगीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करू लागले. त्यानंतर ते दररोज रात्री उशिरा घरी येत असल्याने पत्नीने विचारणा केल्यास तिच्याशी वाद घालून मारहाण केली जात असल्याचा आरोप आहे.

पती सतत एका महिलेबरोबर फोनवर बोलत असल्याचे लक्षात आल्यानंतर पत्नीने मोबाईल तपासला असता जयमाला पडुळकर नावाच्या महिलेबरोबर त्यांचे संबंध असल्याचे समोर आल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. कुटुंबीयांनी समजावून सांगूनही पतीच्या वागण्यात बदल झाला नाही. उलट तो संबंधित महिलेला भेटण्यासाठी हिंजवडीला जात असल्याचेही पत्नीला समजले.

काही दिवसांनी कामानिमित्त बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघालेल्या गजानन चव्हाण यांनी पुसद येथे जाऊन संबंधित महिलेसोबत वास्तव्यास सुरुवात केल्याचे पत्नीला समजले. त्यानंतर दोन मुलांच्या शिक्षणाचा आणि घरखर्चाचा संपूर्ण भार स्वतःवर आल्याने ती घरकाम करून उदरनिर्वाह करत असल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

दरम्यान, सन २००८ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पतीकडून वारंवार शारीरिक व मानसिक छळ झाल्याचा आरोप करत जयश्री चव्हाण यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भिगवण पोलिसांचा मध्यरात्री धडक सापळा; केबल चोरट्यांची टोळी जेरबंद

Saturday, 27 June 2026, 20:02

खेळाडूंसाठी सुवर्णसंधी! बारामतीत साकारणार जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल; अनेक खेळांच्या सुविधा एकाच ठिकाणी

Saturday, 27 June 2026, 19:29

TET उमेदवारांसाठी मोठी बातमी: परीक्षा रद्द; पुन्हा नोंदणी किंवा शुल्क भरण्याची गरज नाही

Saturday, 27 June 2026, 18:52

शाळेत शिक्षण की धोकादायक काम? शिडीवर चढवून विद्यार्थ्यांकडून स्वच्छता; बारामतीतील पालकांचा गंभीर आरोप

Saturday, 27 June 2026, 18:33

Sasavad News : धूळ खात पडलेल्या 65 बेवारस वाहनांच्या मालकांचा सासवड पोलिसांनी लावला शोध; 8 दिवसांत ताबा न घेतल्यास होणार लिलाव -पोलीस निरीक्षक संतोष घोळवे..

Saturday, 27 June 2026, 18:23

सोरतापवाडी येथील श्री स्वामी समर्थ मठात देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेला दुचाकीस्वाराने उडवले; दुचाकीचालकावर गुन्हा दाखल..

Saturday, 27 June 2026, 18:16
Next Post

पुणे-सातारा महामार्गावर 'बर्निंग कार'चा थरार; काही मिनिटांतच गाडी जळून खाक, सर्व प्रवासी सुखरूप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.