Thursday, November 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 November 2026, 9:51

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बारामती तालुक्यातील गोजुबावी येथे व्यावसायिक राणा सूर्यवंशी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याला 15 दिवस झाले, तरी पोलिसांना अद्याप मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचता आलेले नाही. या प्रकरणात आतापर्यंत 4 जणांना अटक झाली असून एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. मात्र, तपासात अद्यापही हल्ल्यामागील नेमके कारण समोर आलेले नाही.

18 तारखेला घडलेल्या या घटनेत सुरुवातीला गोळीबार झाल्याची चर्चा होती, परंतु धारदार शस्त्राने वार केल्याचे तपासात स्पष्ट झाले. या हल्ल्यानंतर राणा यांच्यासोबत असलेले 3 निकटवर्तीय अचानक फरार झाल्यामुळे संशय बळावला आहे. सीसीटीव्ही फुटेजमधील हालचालींवरून पोलिसांचा त्यांच्यावरील संशय आणखी वाढला असून, त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध ठिकाणी छापेमारी करत आहेत. बारामती पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक नारायण पवार यांनी, हे तिघे हाती लागल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा खरा उलगडा होईल, असे स्पष्ट केले आहे.

या संपूर्ण प्रकरणाने राणा यांना मिळालेल्या वाय-प्लस सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आणला आहे. एका खासगी व्यावसायिकासाठी 3 ते 4 जिल्ह्यांतील पोलीस कर्मचारी तैनात असल्याचे समोर आल्यानंतरही आश्चर्य व्यक्त होत आहे. दुसरीकडे, सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस ठाण्यांमध्ये कर्मचारी अपुरे पडत आहेत. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक सदानंद दाते यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन जाब विचारला असून काहींना नोटिसा बजावल्या आहेत. या प्रकरणाच्या चौकशीची सूत्रे आता अपर पोलीस महासंचालक निखिल गुप्ता यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

राणा यांचे काही राजकीय नेत्यांशी असलेल्या जवळीकीमुळे पोलिसांमधील काही अधिकाऱ्यांनी नियमबाह्य मदत केल्याचे आरोपही होत आहेत. त्यांची वाय-प्लस सुरक्षा आता काढून घेतली असली, तरी या सुरक्षेसाठी इतके पोलीस बल वापरल्याबद्दल जबाबदारी कोणाची, हा प्रश्न कायम आहे. आता 15 दिवसांनंतरही तीन जण फरार असल्याने पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हल्ल्यामागचा खरा उद्देश आणि पडद्यामागील सूत्रधार कधी समोर येणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

दौंडचा चेहरामोहरा बदलणार? 2,400 एकर वनक्षेत्रासाठी मोठा प्लॅन; तलाव, बिबटे अन् पर्यटनावर विशेष लक्ष

Thursday, 5 November 2026, 10:01

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

Thursday, 5 November 2026, 9:54

राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाचा तपास थंडावला? 15 दिवस उलटले, तरी गूढ कायम; 3 निकटवर्तीय फरार!

Thursday, 5 November 2026, 9:51

सिग्नलमध्ये छेडछाड, ट्रेनवर दगडफेक अन् दरोड्याचा प्रयत्न! महालक्ष्मी एक्सप्रेस प्रकरणानंतर रेल्वे प्रशासन अलर्ट

Thursday, 5 November 2026, 9:15

पोलिसांना चकवा देत होता, पण मैत्रिणीला भेटायला येताच फसला; पुण्यात फरार सराईत गुन्हेगार अखेर जेरबंद अखेर जेरबंद

Thursday, 5 November 2026, 9:05

एसटीच्या आरक्षण केंद्राचा अजब नियम; UPI अन् कार्डला नकार, प्रवाशांना रोकड आणण्याची सक्ती

Thursday, 5 November 2026, 8:53
Next Post

पिंपरी-चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटणार? 15 वर्षांपासून रखडलेल्या पवना प्रकल्पाला अखेर गती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp