Friday, May 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला तात्काळ फाशी द्या – मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे ग्रामस्थांची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 5 May 2026, 20:00

Pune News नसरापूर, ता. ५ : नसरापूर (ता. भोर) येथे घडलेल्या अमानुष घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अवघ्या तीन वर्षांच्या निरपराध चिमुकलीवर अत्याचार करून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने गावात शोककळा आणि संतापाची लाट उसळली आहे. “मानवतेलाच काळिमा फासणारी” अशी ही घटना असल्याची भावना संतप्त ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. Pune News

१ मे रोजी घडलेल्या या घटनेनंतर नसरापूर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी एकत्र येत राज्य सरकारकडे तातडीच्या कारवाईची मागणी केली आहे.

 

ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. या निवेदनात आरोपीला फाशीची शिक्षा, प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व आईला शासकीय नोकरी देणे, तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“आमच्या गावात घडलेली ही घटना अत्यंत भीषण आहे. अशा विकृत प्रवृत्तीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. गावात ठिकठिकाणी बैठका घेऊन न्यायासाठी लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणात सरकार अत्यंत गंभीर असल्याचे स्पष्ट करत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत सुटू दिले जाणार नाही, असे आश्वासन दिले. न्यायवैद्यक व तांत्रिक पुरावे गोळा करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होण्यासाठी फास्ट ट्रॅक न्यायालयाबाबतही सरकार प्रयत्नशील आहे.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. महिला सुरक्षेसाठी कठोर कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.
या घटनेनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ग्रामस्थांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला आहे.

“न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही” — नसरापूर ग्रामस्थांचा निर्धार
ही घटना केवळ एका कुटुंबावर आलेले दु:ख नसून संपूर्ण समाजासाठी धोक्याची घंटा असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता प्रशासन कितपत जलद आणि कठोर कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

चारित्र्यावर संशय, अन् थेट जीवे मारण्याचा प्रयत्न! महिला पोलीस अधिकाऱ्यावर पतीने केला प्राणघातक हल्ला.

Friday, 29 May 2026, 20:56

Big Breaking: लोणी काळभोर अपर तहसील कार्यालयातील तलाठ्यावर 2 लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Friday, 29 May 2026, 20:19

“जमीन कशी घेता, आम्ही पाहतो!” म्हणत जमिनीच्या वादातून सोलापूर सीमेवर 6 जणांची गोळ्या झाडून हत्या

Friday, 29 May 2026, 20:00

जनगणना करायला गेलेल्या पालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला जबर मारहाण; पुण्यातील घटना

Friday, 29 May 2026, 18:55

रुग्णांच्या जीवाशी खेळ? नसरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीत गंभीर त्रुटी; आमदारांकडून कामाची पाहणी

Friday, 29 May 2026, 18:36

हार्दिक पांड्या टीममधून बाहेर? मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; चाहत्यांमध्ये चर्चांना उधाण

Friday, 29 May 2026, 18:26
Next Post
Dhule Crime: A stain on the teaching profession..! Repeated rape by giving a girl a sedative; The principal's action creates a stir in the area

Pune News : पुण्यात ९ वर्षीय मुलीवर आजोबांकडून अत्याचाराचा प्रयत्न, आरोपी वृद्धाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.