Salman Khan News मुंबई, ता. 4 : बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान याच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. विशेष न्यायालयात दिलेल्या साक्षीत त्याच्या बॉडीगार्डने हा हल्ला केवळ दहशत निर्माण करण्यासाठी नसून, थेट सलमान खानची हत्या करण्याच्या उद्देशानेच करण्यात आल्याचा दावा केला आहे. Salman Khan News

१४ एप्रिल २०२४ रोजी पहाटे गॅलेक्सी अपार्टमेंट्स बाहेर झालेल्या गोळीबाराने संपूर्ण देश हादरला होता. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली होती. न्यायालयीन सुनावणीदरम्यान पहिला साक्षीदार म्हणून हजर राहिलेल्या बॉडीगार्डने सांगितले की, १३ एप्रिलच्या संध्याकाळी ७ वाजता त्याने ड्युटी सुरू केली होती. लॉरेन्स बिश्नोई टोळी कडून मिळणाऱ्या सततच्या धमक्यांमुळे आधीच कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. Salman Khan News

पहाटे सुमारे ४ वाजता सुरक्षा पथकाला फटाक्यांसारखा आवाज ऐकू आला. सीसीटीव्ही तपासल्यावर मोटरसायकलवरून आलेले दोन हेल्मेटधारी हल्लेखोर दिसले. त्यांनी इमारतीच्या दिशेने चार ते पाच गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपींनी तत्काळ आय लव्ह बांद्रा पॉइंट दिशेने पळ काढल्याची माहिती साक्षीत देण्यात आली. Salman Khan News

दरम्यान, सरकारी वकील महेश मुळे यांनी न्यायालयात सादर केलेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बॉडीगार्डने हल्लेखोरांची ओळख पटवली. त्याने स्पष्ट केले की, गोळीबाराच्या वेळी सलमान खान आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरील बेडरूममध्ये उपस्थित होता. Salman Khan News
उलटतपासणीत मात्र बॉडीगार्डने कबूल केले की, अभिनेत्याला मिळणाऱ्या धमक्यांबाबत त्याच्याकडे थेट माहिती नव्हती. दरम्यान, २ मे रोजी दुसऱ्या साक्षीदार म्हणून एका पोलीस रक्षकानेही न्यायालयात हजेरी लावत गोळीबाराचे प्रत्यक्ष दर्शन झाले नसले, तरी घटनास्थळी गोळ्यांच्या खुणा पाहिल्याचे सांगितले. या साक्षीनंतर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, सलमान खानवरील हल्ल्याच्या कटाबाबत तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. Salman Khan News







