Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 September 2026, 17:18

पुणे : अँटिलिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए विशेष न्यायालयाने मोठा दिलासा देत जामीन मंजूर केला आहे. 13 मार्च 2021 पासून म्हणजे जवळपास साडेपाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात घालवल्याची बाब मुख्यत्वे विचारात घेऊन कोर्टाने हा निर्णय घेतला आहे.

माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए विशेष न्यायालयाने जामीन अटी व नियमांसह मंजुर केला आहे.सचिन वाझे यांच्याकडे पासपोर्ट असल्यास तो तात्काळ त्यांना एनआयएकडे जमा करावा लागेल.या प्रकरणातील महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंदवून पूर्ण होईपर्यंत वाझेंना मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 5 जिल्ह्यांमध्ये राहण्यास किंवा प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.सुनावणीच्या दिवशी न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी त्यांना या जिल्ह्यांत येण्याची मुभा असेल; मात्र सुनावणी संपताच त्यांना तात्काळ निर्धारित ठिकाणी परतावे लागेल.

कोर्टाने जामीन अर्ज मंजूर करताना आरोपपत्रातील विविध पुरावे, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यांतर्गत लावलेले आरोप आणि मनसुख हिरेन हत्येशी संबंधित परिस्थितीजन्य पुराव्यांची सखोल पाहणी केली. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींना आधीच मिळालेला जामीन हेदेखील एक कारण ठरले. न्यायालयाने स्पष्ट केले की, प्रथमदर्शनी आरोप निश्चित करणे आणि जामीन फेटाळणे या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या बाबी आहेत.

या संपूर्ण प्रकरणात एनआयएकडून 14,000 हून अधिक पानांचे विशाल आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात तब्बल 320 साक्षीदारांचा समावेश आहे. त्याशिवाय मोठ्या प्रमाणावर डिजिटल व इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करण्यात आले आहेत. दीर्घकाळ चालणारी कायदेशीर प्रक्रिया आणि वाझेंचा कोठडीतील कालावधी लक्षात घेऊन विशेष न्यायालयाने त्यांना अटींवर जामीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकरी नुकसान भरपाईच्या नियमांत मोठा बदल; पंचनाम्यावर शेतकऱ्याची सही अनिवार्य

Tuesday, 29 September 2026, 18:03

ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद! तुमच्या राज्यात किती दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प? जाणून घ्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

Tuesday, 29 September 2026, 17:57

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

Tuesday, 29 September 2026, 17:19

सचिन वाझेंना दिलासा! मनसुख हिरेन हत्या अन् अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटी शर्थीसह जामीन मंजूर

Tuesday, 29 September 2026, 17:18

केतन अग्रवाल प्रकरणात मोठा खुलासा! सोशल मीडिया अन् Google Searchवरून रचला कट; चार्जशीटमधून धक्कादायक माहिती समोर

Tuesday, 29 September 2026, 16:55

लोणी काळभोर सोसायटीची 109 वी सर्वसाधारण सभा उत्साहात

Tuesday, 29 September 2026, 16:51
Next Post

मंत्रिमंडळाचे १० मोठे निर्णय! राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी; वाचा सविस्तर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp