Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी कांचनमध्ये स्वच्छतेचा बोजवारा! महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचऱ्याचे ढीग, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Tuesday, 29 September 2026, 16:11

उरुळी कांचन, (पुणे) : येथील नामांकित ‘महात्मा गांधी महाविद्यालया’च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच कचऱ्याचे मोठमोठे ढीग आणि ओसंडून वाहणाऱ्या कचरा कुंड्यांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. उरुळी कांचनसह दौंड तालुक्यातील अनेक हजारो विद्यार्थी या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यामुळे या महाविद्यालयातील शिक्षक, पालक व विद्यार्थ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे.

उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडे अद्ययावत वाहने आणि 20 कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा उपलब्ध असतानाही कचरा उचलला जात नसल्याने उरुळी कांचन गाव कचरा आणि घाणीच्या विळख्यात सापडले आहे. या प्रकारामुळे हजारो विद्यार्थी, शिक्षक, स्थानिक व्यापारी आणि वाटसरूंचे आरोग्य धोक्यात आले असून, ग्रामपंचायतीच्या या कारभाराविरोधात नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावरच कचरा कुंड्या ठेवण्यात आल्या असून, त्या नेहमीच कचऱ्याने ओसंडून वाहतात. कुंड्यांच्या बाहेरही कचऱ्याचे ढीग साचल्याने या ठिकाणी फिरस्ती कुत्रे आणि डुकरांचा वावर प्रचंड वाढला आहे. शाळेत येणारे-जाणारे हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि पाल्यांना सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांना दररोज या उग्र दुर्गंधीचा सामना करत वर्ग गाठावा लागत आहे. महाविद्यालयाच्या आजूबाजूला अनेक दुकाने आणि टपऱ्या असून, या व्यापारी वर्गाला दुर्गंधीमुळे व्यवसाय करणेही दुरापास्त झाले आहे.

विशेष म्हणजे महात्मा गांधी विद्यालयाचे उपाध्यक्ष, सचिव, विश्वस्त आणि संचालक मंडळातील अनेक पदाधिकारी याच परिसरातून ये-जा करीत असतात. मात्र महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर साचलेल्या कचऱ्याच्या समस्येकडे लक्ष देण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे संचालक मंडळ केवळ पदे मिरवण्यासाठी आणि कार्यक्रमांच्या व्यासपीठावर नावे झळकवण्यासाठीच आहे का?, असा थेट सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

स्वामी शाळेकडील रस्त्यावरही तीच दुरवस्था..
केवळ महात्मा गांधी कॉलेजच नाही, तर उरुळी कांचन हद्दीतील स्वामी शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरही हीच भीषण परिस्थिती आहे. गल्लोगल्ली आणि पुणे-सोलापूर महामार्गाच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग उरुळी कांचनच्या वैभवाला उघडपणे गालबोट लावत आहेत. वर्तमानपत्रांमधून वारंवार बातम्या प्रसिद्ध करून आणि ग्रामपंचायतीचे लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत.

दरम्यान, मोठमोठ्या नेत्यांच्या नावाशी जोडलेल्या शिक्षण संस्थांच्या दारातच जर अशी भयानक परिस्थिती असेल, तर सामान्य वस्त्यांची काय अवस्था असेल? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने झोपेचे सोंग न घेता महाविद्यालयाच्या गेटसमोरील कचरा कुंड्या तत्काळ हटवाव्यात अशी मागणी जोर धरू लागली आहे.

यंत्रणा सज्ज, मग गाव घाणीत का?
उरुळी कांचन ग्रामपंचायतीकडे कचरा व्यवस्थापनासाठी कोणत्याही साधनांची कमतरता नाही. 6 घंटागाड्या, 1 मोठा कंटेनर आणि 1 ट्रॅक्टर, 5 पुरुष कर्मचारी व 8 महिला सफाई कर्मचारी असा तब्बल 15 ते 20 जणांचा ताफा एवढी अद्ययावत वाहनांची यंत्रणा आणि मनुष्यबळ पाठीशी असतानाही जर दररोज कचरा उचलला जात नसेल, तर या यंत्रणेचा काय उपयोग? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.

याबाबत ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी टी. एस. पाटील म्हणाले, “गणपती विसर्जन झाल्यानंतर अनेक कर्मचारी आजारी आहेत. त्यामुळे परिसरातील कचरा उचलला नाही. मात्र सकाळपासून परिसरातील सर्व कचरा उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच कचरा मुक्त होणार आहे.”

 

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

'चिंतामणी'ला फुलांची सजावट! अंगारकी चतुर्थीनिमित्त थेऊरला भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp