उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता 12 विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे. अशी माहिती संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
महाविद्यालयातून एकूण १५६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील १५६ पैकी १५६ विद्यार्थी पास झाले आहेत. तर अस्मिता विद्यालय या केंद्रात एकूण ३७६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यातील सर्वच्या सर्व ३७६ विद्यार्थी पास झाले आहेत.
विद्यालयातील प्रथम चार आलेले विद्यार्थी
- सुमित दीपक भालेराव 93.00 टक्के,
- श्रावणी अमोल टिळेकर 89.17 टक्के,
- दिया दीपक गोंडचर 83.50 टक्के,
- पायल संतोष बगाडे 83.17टक्के
दरम्यान, जुनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेची बॅच असताना देखील १०० टक्के निकाल लागला आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उरुळी कांचनसह परिसरातून कौतुकांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. विद्यार्थीच्या या उज्जवल यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन, सचिव डॉ. अजिंक्य कांचन, संचालक. डॉ. अप्पासाहेब जगदाळे, परभणे सर, संपूर्ण स्टाप यांनी विद्यार्थांचे अभिनंद केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
याबाबत बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेवराव कांचन म्हणाले, “मागील तीन वर्षापासून संस्थेचा निकाल १०० लागत आहे. संस्थेची नेत्रदीपक प्रगती यापुढेही सुरूच राहणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक युगात वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकीक करावा. विविध शाखेतून देखील स्पर्धा परीक्षांना वाव आहे. आत्ता पासून स्पर्धा परिक्षांचा अभ्य़ास करा. आपले जीवन बलशाही बनवायचे असेल तर कष्ट, चिकाटी व जिद्द शिवाय यशाला पर्याय नाही.”