हनुमंत चिकणे
Uruli Kanchan : उरुळी कांचन, (पुणे) : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी व मराठा समाज आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे सर्वपक्षीय साखळी उपोषण शनिवारी (ता. २८) सुरु करण्यात आले आहे.
सर्वच राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदी
मराठा आरक्षणसाठीच्या जरांगे पाटील यांच्या लढ्याला बळ देण्यासाठी सर्वपक्षीय सकल मराठा समाजाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणाचे पत्र उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन यांनी लोणी काळभोर पोलिसांना दिले आहे. यावेळी सर्वच राजकीय पुढार्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
यावेळी मराठा समाजातील सर्वच पक्षातील नेते व कार्यकर्ते पक्षीय मतभेद विसरून मराठा आरक्षण या एकाच मुद्द्यावर एकत्र आले होते. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही अथवा तसा निर्णय होत नाही. (Uruli Kanchan ) तोपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याला गावात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.
मराठा कुणबी आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणुन लाक्षणिक साखळी उपोषण सुरू आहे. (Uruli Kanchan ) यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय, मनोज जरांगे पाटील तुम आगे बढो-हम तुम्हारे साथ है, जय जिजाऊ जय शिवराय, आरक्षण आमच्या बापाचे, नाही कुणाच्या बापाचे, इत्यादी घोषणा देऊन उपोषणकर्ते पाठिंबा देत होते.
मराठा आरक्षणाचे लक्ष…
‘चुलीत गेले पक्ष आणि चुलीत गेले नेते’ ‘मराठा आरक्षण हेच आमचे लक्ष’..मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणतेही राजकीय पक्ष व नेत्याला गावात प्रवेश नाही. आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. हा संदेश समाज माध्यमांमध्ये फिरत होता.(Uruli Kanchan ) यावेळी सर्वांकडून हा मंत्र स्वीकारण्यात आला. त्या दिशेने पाऊल टाकण्यात येणार आहे. असे सर्वच राजकीय पक्षातील मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी जाहीर केले.