उरुळी कांचन, (पुणे) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीची लेखी परीक्षा बुधवारपासून (ता. २१) सुरू झाली. बारावीच्या परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे उरुळी कांचन (ता. हवेली) येथील अजिंक्य चारिटेबल फाऊंडेशन संचलित डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजमध्ये गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी कुठलाही ताण न घेता मोकळ्या वातावरणात व शिस्तबद्ध पद्धतीने पेपर द्यावा, अशा शुभेच्छा सचिव अजिंक्य कांचन यांनी व्यक्त केल्या.
यावेळी संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन, कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे, केंद्रप्रमुख परभणे, उपकेंद्रप्रमुख फलके, जाधव, प्राचार्य जगताप, उपप्राचार्य चव्हाण उपस्थित होते. विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर एकूण ३७४ विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित असल्याची माहिती केंद्रप्रमुख परभणे यांनी दिली.
या केंद्रावर उरुळी कांचन येथील डॉ. अस्मिता ज्युनिअरसह, जोगेश्वरी माता माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई (ता.हवेली) तसेच पंचकोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वाघापूर (ता. पुरंदर), अशा एकूण ३७४ विद्यार्थी उपस्थित होते.
या परीक्षा केंद्रावर, जोगेश्वरी माता माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय वाडेबोल्हाई (ता. हवेली) तसेच पंचकोशी शेतकरी तांत्रिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज वाघापूर (ता.पुरंदर) व अजिंक्य चारिटेबल फाऊंडेशन संचलित डॉ. अस्मिता ज्युनिअर कॉलेजचे ३७४ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित असल्याची माहिती कार्यकारी संचालक डॉ. अप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.
दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उरुळी कांचन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उरुळी कांचन येथील परीक्षा केंद्रावर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.