थेऊर, (पुणे) : कोलवडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रमेश हनुमंत मदने यांची शुक्रवारी (ता.5) बिनविरोध करण्यात आली. उपसरपंच शितल अविनाश भाडळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सरपंच विनायक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंचपदाची निवडणूक घेण्यात आली.
या निवडणुकीत रमेश मदने यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी विनायक गायकवाड यांनी रमेश मदने यांची निवड बिनविरोध झाल्याची घोषणा केली. ग्रामविकास अधिकारी प्रविण खराडे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.
यावेळी पॅनलप्रमुख यशवंत सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास आण्णा गायकवाड, अशोक गायकवाड, मिलापचंद गायकवाड, जयसिंग गायकवाड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शशिकांत गायकवाड, माजी सरपंच सतिश गायकवाड, मारूती मदने, उपसरपंच बाळासाहेब भाडळे, दिलीप गायकवाड, म्हस्कु गायकवाड, विकास कांचन, शंकर मदने, अशोक गायकवाड, राजू गायकवाड, शरद गायकवाड, अमर गायकवाड, उत्तम जगताप, विलास भोसले, नाना मुरकुटे, पंकज गायकवाड, काळुराम गायकवाड, विश्वास गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य सचिन गायकवाड, निलेश रिकामे, संदिप गायकवाड, स्वप्निल नितनवरे, चैत्राली गायकवाड, स्वाती गायकवाड, निशा भोर, प्रिया गायकवाड आदी उपस्थित होते.
गावच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करणार
नवनिर्वाचित उपसरपंच रमेश मदने निवडीनंतर म्हणाले, “गावच्या सर्वांगिण विकास कामासाठी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आम्ही सर्वजण प्रयत्न करु. तसेच भविष्यकाळात मला मिळालेल्या पदाचा विकासकामे करत असताना नागरिकांनी सहकार्य करावे.”