लोणी काळभोर, (पुणे) : लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत अवैध दारू अड्डयावर गुन्हे शाखा युनिट 6 च्या पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत 1000 हजार लिटर रसायन, 70 लिटर हातभट्टीची तयार दारु, व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असा 59 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक उल्हास कदम यांनी दिली.
याप्रकरणी महिला नागिन बबलू राठोड (वय 50, रा. उंद्रे वस्ती, कोलवडी), हिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट 6 चे पथक शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलीस हवालदार रमेश मेमाने व पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांना गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, महिला नागिन बबलू राठोड ही गूळमिश्रित रसायन वापरून गावठी हातभट्टीची दारू तयार करुन ओळखीच्या लोकांना विक्री करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने कोलवडी ग्रामपंचायत हद्दीतील मुळा मुठा नदीच्या किनाऱ्यावर चालू हातभट्टीवर छापा टाकून दारू बनवण्याचे 1 हजार लिटर रसायन, 70 लिटर हातभट्टीची तयार दारु व दारू बनविण्यासाठी लागणारे साहित्य असे 59 हजार रुपयांचे साहित्य जप्त करुन हातभट्टी उद्धवस्त केली. याप्रकरणी आरोपी महिला नागीन राठोड हिच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कारवाईसाठी लोणीकंद पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, पोलीस हवालदार रमेश मेमाने, पोलीस अंमलदार ऋषीकेश व्यवहारे, शेखर काटे, सचिन पवार, सुहास तांबेकर यांच्या पथकाने केली आहे.
View this post on Instagram