हनुमंत चिकणे
Union Bank : लोणी काळभोर, (पुणे) : आताच्या डिजिटल युगात भाजीवाल्यापासून ते मोठ्यात मोठे उद्योगधंदे करणारे उद्योजक हे क्युआरकोड वापरत आहेत. त्याचप्रमणे युनियन बँकेत नागरिकांसाठी मुद्रा कर्ज, पीएम स्वनिधी कर्ज, मोफत क्युआरकोड, सुवर्ण कर्ज आणि सरकारी सामाजिक सुरक्षा या योजना उपलब्ध आहेत. या योजनांचा लाभ ग्राहकांनी घ्यावा. असे आवाहन युनियन बँकेचे विभागीय प्रमुख नवीन जैन यांनी केले आहे. (Union Bank)
हडपसर परिसरातील हडपसर गाव, हडपसर मंडई, मंत्री मार्केट, या परिसरात युनियन बँकेच्या हडपसर गाव शाखेच्या वतीने बँकेतर्फे राबविण्यात आलेल्या “पावर प्रोजेक्ट” अंतर्गत डिजिटल मंडी, एम. एस. एम. ई मेगा आउटरिच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विभागीय प्रमुख नवीन जैन बोलत होते.
यावेळी क्षेत्रीय प्रमुख पार्थसारथी दास, विभागीय उपप्रमुख मयंक भरद्वाज, हडपसर गाव शाखाप्रमुख पराग शितोळे, लोणी काळभोरचे शाखाप्रमुख शरद गायकवाड, पुणे विभागाचे विपणन प्रमुख शंतनू चौहान, आदी उपस्थित होते.
हडपसर गाव शाखाप्रमुख पराग शितोळे यांच्या नेतृत्वाखाली शाखेने ३८ लघुउद्योजकांना मोफत क्युआरकोड, ध्वनी बॉक्स, नामफलकाचे वितरण करण्यात आले. त्यामुळे प्रत्येक विक्रेता डिजिटल व्यवहाराद्वारे देवाण घेवाण करू शकणार आहे. तसेच हडपसर गाव शाखेकडून मागील व चालू वर्षात १२० अधिक पीएम स्वनिधी, नारीशक्ती व मुद्रा कर्जाचे वाटप करण्यात आले असून १५० अधिक क्युआर कोडचे वाटप ग्राहकांना करण्यात आले आहे.
दरम्यान, सर्व ग्राहकांना बँकेच्या युनियन मुद्रा, यूनियन नारीशक्ती, पीएम स्वनिधी स्वर्ण कर्जाची महिती देऊन या योजनेमध्ये व्याजदराची, प्रक्रिया शुल्कावरील सवलत व लघुउद्योजकांना याचा फायदा कसा होईल याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
याबाबत बोलताना क्षेत्रीय प्रमुख पार्थसारथी दास म्हणाले, “युनियन बँकेच्या वतीने विवध योजना राबविल्या जात आहेत. यामध्ये विनातारण मुद्रा लोन सारखी कर्ज लगेच मजूर होत आहेत. काही बॅंका या फक्त मोठ्या लोकांना अथवा व्यवसायिकांना कर्ज मंजूर करतात. मात्र युनियन बँक हि फेरीवाले, भाजीवाले, अशा छोट्या छोट्या व्यावसायिकांना सुध्दा कर्ज दिली जातात. त्यामुळे मुद्रा लोनमुळे गरीब व्यावसायिकांना परवडणारे आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी तसेच बाजापेठेच्या ठिकाणी असे छोटे छोटे कार्यक्रमाचे आयोजन करून ग्राहकांना माहिती देण्याचे काम युनियन बँकेच्या वतीने करण्यात आले.” (Union Bank)