Rahul Kul News : पुणे : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत (under-the-pradhan-mantri-awas-yojana) पात्र बांधकाम कामगारांना (construction-workers) स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर घरबांधणीसाठी प्रति लाभार्थी (rs-2-lakh-per)२ लाख अनुदान (beneficiary) देण्यात यावे. अशी मागणी (demand) आमदार अॅड. राहुल कुल (Rahul Kul News ) यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली आहे. Rahul Kul News
आमदार अॅड. राहुल कुल यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे मागणी..!
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ तसेच कुरकुंभ एमआयडीसीतील कंत्राटी कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांची आज आमदार अॅड. कुल यांनी विधानभवन येथे भेट घेतली. यावेळी अॅड. राहुल कुल यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्याकडे वरील मागणी केली आहे
कंत्राटी कामगारांना नियमानुसार सुविधा न पुरविता खोटी कारणे देऊन कामावरुन काढून टाकणे, नियमबाह्य पद्धतीने प्रोडक्शन लाईन वर काम करायला लावणे, पगार कपात करणे असे प्रकार राज्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये वारंवार घडत असल्याचे आमदार अॅड. कुल यांनी मंत्री खाडे यांच्या निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने योग्य कार्यवाही करावी अशी मागणी केली.
दरम्यान, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजनांची अंमलबजावणी कालबद्ध रित्या करावी. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पात्र बांधकाम कामगारांना स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर घरबांधणीसाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे प्रति लाभार्थी रु २ लक्ष अनुदान द्यावे. अशी मागणी कुल यांनी मंत्री खाडे यांच्या कडे केली. तसेच दोन्ही मागण्याबाबत सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन कामगार मंत्री सुरेश खाडे दिले आहे. असे आमदार अॅड. कुल यांनी सांगितले