पुणे : Pune Crime News : स्वारगेट परिसरात कोयते, कुऱ्हाड अन् पालघन घेऊन दहशत माजवणाऱ्या सचिन माने टोळीच्या -(terrorizing-gang) प्रमुखासह(including-leader) १४ जणांच्या (14-people-arrested-)स्वारगेट पोलिसांनी (swargate-police) मुसक्या आवळल्या आहेत. घोरपडी पेठेत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी सचिन मानेला अटक केली आहे. (Pune Crime

१४ जणांना अटक
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दिवशी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने दुसऱ्या टोळीवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला केला होता. त्या दिवशीपासून या घटनेतील आरोपी फरार होते. स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे दाखल होते.
दरम्यान, पोलिसांनी घोरपडी पेठेत टोळी प्रमुख सचिन माने हा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. तसेच दहशत माजवणाऱ्या सचिन माने टोळीच्या १४ जणांना पोलिसांनी केली अटक केली. आरोपींच्या ताब्यातून कोयते, कुऱ्हाड, पालघन यासारखी घातक शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.







