Saturday, July 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भीमा नदीपात्रात दिवस-रात्र अवैध वाळू उपसा; महसूल-पोलिस प्रशासनावर बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप……

योगेश मारणेby योगेश मारणे
Sunday, 5 July 2026, 18:47

न्हावरे : शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील भीमा नदीपात्रात जेसीबी मशीन व ट्रॅक्टरच्या साहाय्याने दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे वाळूमाफियांचे अक्षरशः फावले असून, महसूल व पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थ निलेश भुजंगराव कोंडे यांनी केला आहे. या प्रकरणी त्यांनी शिरूर तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीने धडक कारवाईची मागणी केली आहे. मात्र, या अवैध वाळू उपशामागे महसूल विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचाच वरदहस्त असल्याची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

कोंडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, २८ जूनपासून भीमा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असून, जेसीबी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने राजरोसपणे वाळूची चोरी केली जात आहे. या प्रकाराची माहिती २९ जून रोजी शिरूर पोलिस ठाण्यास देण्यात आली होती. तसेच ग्रामपंचायत प्रशासनालाही लेखी स्वरूपात कळविण्यात आले होते. ग्रामपंचायतीच्या प्रशासकांनीही स्वतंत्र पत्राद्वारे तहसीलदारांकडे कारवाईची मागणी केली असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

मात्र,तक्रारींना चार ते पाच दिवस उलटूनही संबंधित यंत्रणांनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप कोंडे यांनी केला आहे. परिणामी, वाळूमाफियांचे मनोबल वाढत असून शासनाच्या महसुलाला लाखो रुपयांचा फटका बसत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

 

या प्रकरणातील व्हिडिओ पुरावे तपासून अवैध वाळू उपशात वापरण्यात आलेले जेसीबी, ट्रॅक्टर व इतर वाहने तातडीने जप्त करावीत, संबंधित चालक, मालक व अन्य जबाबदार व्यक्तींवर गुन्हे दाखल करावेत, तसेच कारवाई करण्यास विलंब करणाऱ्या महसूल व पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी. अशी मागणीही कोंडे यांनी केली आहे.

या तक्रारीच्या प्रती पुणे जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता महसूल व पोलिस प्रशासन या गंभीर प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेते आणि वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारते का,याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

“तक्रार केली; उलट धमक्या मिळू लागल्या”

याबाबत निलेश भुजंगराव कोंडे म्हणाले, “भीमा नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत मी वेळोवेळी महसूल व पोलिस प्रशासनाला लेखी तक्रारी करून माहिती दिली. मात्र कारवाई होण्याऐवजी वाळू माफियांकडून मलाच धमक्या दिल्या जात आहेत.त्यामुळे महसूल प्रशासनाची भूमिकाच संशयास्पद वाटत आहे.प्रशासनाने तातडीने अवैध वाळू उपसा बंद करून संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.अशी मागणी कोंडे यांनी केली आहे.

 

योगेश मारणे

योगेश मारणे

लेखक सुमारे १८ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. दैनिक प्रभात, सामना आणि पुण्यनगरी या वृत्तपत्रांमध्ये बातमीदार म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. राजकारण, क्राईम आणि शोध पत्रकारिता यामध्ये विशेष कामाचा अनुभव तसेच दोन वर्षांपासून 'पुणे प्राईम न्यूज'मध्ये प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

देशाचे नवे शिक्षण मंत्री कोण? धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीत हालचाली, ‘ही ‘नावं चर्चेत

Saturday, 25 July 2026, 22:03

राजगडावर शुल्कवसुली सुरू; मात्र स्वच्छतेचा बोजवारा! वन विभाग व पुरातत्त्व विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह

Saturday, 25 July 2026, 21:37

महात्मा गांधी विद्यालयात स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन

Saturday, 25 July 2026, 20:59

तांभाड येथे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारा चोरी; ट्रान्सफॉर्मरचेही नुकसान

Saturday, 25 July 2026, 20:53

व्हाट्सअँप डीपीवर कंपनी संचालकाचा फोटो लावून 20 लाखांची फसवणूक; राजगड पोलिसांत गुन्हा दाखल

Saturday, 25 July 2026, 20:42

नसरापूर येथे मद्यधुंद अवस्थेत कार चालविणाऱ्या चालकावर राजगड पोलिसांची कारवाई

Saturday, 25 July 2026, 20:35
Next Post

डोक्यावर कर्जाचा डोंगर, मानसिक त्रास अन् एकाच कुटुंबातले पाचही जण अचानक गायब; शेवटचं लोकेशन पुणे अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.